नाशिक – सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच नाशिकरोड परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यातील व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. सोमठाणे येथे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या कृष्णा गिते याच्यावर बिबट्याने हल्ला केला. कृष्णाच्या पाठीवर, कानाजवळ जखमा झाल्या आहेत. कृष्णाने प्रतिकार करतानाच मदतीसाठी आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला. कृष्णाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा >>> नाशिक: दुचाकी झाडावर धडकून दोघांचा मृत्यू

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली

दुसरीकडे, नाशिक वनपरिमंडळातंर्गत नाशिकरोड परिसरातील आनंद नगरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रियासोद्दिन शेख यांची वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनपरिमंडळ अधिकारी भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेख यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत सदर परिसरात दिवसा व रात्रीची गस्त वन कर्मचाऱ्यांकडून सुरु असून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. परिसरात वनविभागामार्फत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. २३ जुलैनंतर परिसरात बिबट्याचा परिसरात वावर असल्याचे कोठेही आढळून आले नाही. काही जणांकडून अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे कोणालाही बिबट वन्यप्राणी दिसून आल्यास त्यांनी वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. कोणीही अफवा पसरविल्यास त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे.