नाशिक – शहरातील खुनांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसून शनिवारी किरकोळ वादातून गंगापूर रोड परिसरात २७ वर्षांच्या युवकाचा मित्रांनीच खून केला. पोलिसांनी त्वरीत कारवाई करीत दोन संशयितांना ताब्यात घेतले.

शहरात ऑगस्टपासून खुनांची मालिका सुरू आहे. अंबड, सिडकोनंतर हे लोण आता गंगापूर रोड परिसरात आले आहे. अंबड पोलीस ठाण्याचे एक पथक गुन्ह्यातील संशयितांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात गेले होते. त्यावेळी संशयित समशेर शेख (४०, रा. कार्बन नाका) आणि दीपक सोनवणे (रा.सातपूर) हे विश्वनाथ उर्फ बबलू सोनवणे हा अपघातात जखमी झाला, असे सांगत त्यास जिल्हा रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी अंबड पोलीस पथकाला हा प्रकार संशयास्पद वाटला. विश्वनाथच्या अंगावरील खुणा पाहून त्याचा खून झाल्याचा संशय बळावला. पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेत गंगापूर रोड आणि सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. दोन्ही पोलीस ठाणे हद्दीतील पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. संशयितांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?

हेही वाचा – नाशिक : सिडको युवक हत्या प्रकरणी पाच संशयितांना पोलीस कोठडी

विश्वनाथशी किरकोळ वाद झाला होता. या वादातून समशेर आणि दीपक यांनी त्यास मारहाण केली. मारहाणीत विश्वनाथची प्रकृती बिघडली. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले असल्याची कबुली संशयितांनी दिली. गंगापूर रोड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ, दीपक आणि समशेर हे जवळचे मित्र होते. शनिवारी सायंकाळी तिघेही दारू पित असताना किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादात विश्वनाथने एका मित्राची बाजू घेतली. त्याची बाजू का घेतली, म्हणून दीपक, समशेर यांनी विश्वनाथ यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने वार केला. आपल्या हातून काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव होताच संशयितांनी सातपूर परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेतली. मात्र जखमी विश्वनाथची स्थिती पाहता रुग्णालयांनी उपचारास नकार दिला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याचा अपघात झाला असून आम्ही सोबत होतो, असे संशयितांनी सांगितले. परंतु, अंबड पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

हेही वाचा – नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याचे ग्रामविकास मंत्र्यांचे आश्वासन; व्यापाऱ्यांचे भले होत असल्याची तक्रार

एमपीडीए अंतर्गत कारवाई

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार गौरव पाटील (२३, रा. वृंदावन नगर) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत वृंदावन नगर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते. आरोपीचा शोध घेत कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना गौरव हा वृंदावन नगर परिसरात राहत नसून पुणे येथे लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली.