नाशिक  : नातवाकडून सातत्याने देण्यात येत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल पोलिसांकडे तक्रोर केल्याने संतप्त नातवाने आजोबांना नाल्यात फे कू न दिले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला असून संशयिताविरुद्ध  आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरणारेजवळील धोंडेगाव येथे रघुनाथ बेंडकुळे (७०) कुटुंबातील अन्य सदस्यांसमवेत राहत होते. नातू किरण (२३) याने आजोबांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगून त्यांना विनाकारण घराबाहेर पडणे, मंदिरात जाणे बंद के ले होते. आजोबांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्याने रघुनाथ यांना लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवले होते. या सर्व प्रकाराविरोधात हरसूल पोलीस ठाण्यात रघुनाथ यांनी महिनाभरापूर्वी तक्रार केली होती. आजोबांनी पोलीस ठाण्यात तक्रार

के ल्याचा राग किरणच्या मनात होता. सोमवारी रात्री आजोबा घराबाहेर झोपले असताना त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून आणि हातापायाला लोखंडी साखळी बांधली. मारुती ओमनी या वाहनातून धोंडेगाव, मखमलाबाद, आडगावमार्गे ओढा गावाजवळच्या नाल्यात किरणने आजोबांना फेकून दिले. नाल्यात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावर आडगाव पोलिसांनी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.

Story img Loader