धुळे – मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार प्रकरणी दोषींविरुध्द कारवाई झाली नसल्याने ठाकरे गटाच्या धुळे जिल्हा युवासेनेने आंदोलन करुन भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी ’५६ इंच की छाती कुछ काम नही आती.’ अशा घोषणा देण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती अधिकारी सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, विधानसभा प्रमुख योगेश मराठे, धुळे शहर संघटक स्वप्निल सोनवणे आदी सहभागी झाले होते. या संदर्भात युवासेनेने दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे. मणिपूर घटनेच्या पार्श्‍वभूमीवर भारतातील महिलांना सुरक्षा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अयशस्वी ठरले आहेत. सत्तेच्या लाचारीसाठी महिलांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार भाजपच्या सत्ताधार्‍यांकडून होत आहे. मणिपूर घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई व्हावी. तसेच महिलांवरील अत्याचार त्वरित रोखावे. महिलांवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी घालू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuva sena of thackeray group protest against women paraded naked in manipur zws