नवी मुंबई:  नवी मुंबई शहरात पाच दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून गुरुवारी २४ रुग्ण वाढले.  शहरात करोनाबाधितांची संख्या २३० झाली असून, एपीएमसीमध्ये आतापर्यंत २० करोनाबाधित सापडले असून त्यांच्या कुटुंबीयांनाही संसर्ग होत असून आज एका भाजी विक्रेत्याची पत्नी, मुलगा, मुलगीही करोनाबाधित झाली आहे. वाशीमध्ये ६, तुर्भेमध्ये ७, कोपरखैरणेत ३,  घणसोलीमध्ये १, ऐरोलीत ३, तर दिघा येथे ४ रुग्ण सापडले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

पनवेलमध्ये पाच करोनाबाधित

पनवेल : पनवेलमध्ये गुरुवारी पाच नवीन करोनाबाधितांची भर पडल्याने करोनाबाधितांचा आकडा ६७ वर पोहचला आहे. करोना साथरोगातून गुरुवारी तिघांची प्रकृती बरी झाल्याने उपचारानंतर घरी परतलेल्यांची संख्या २८ पोहचली आहे. गुरुवारी कामोठे वसाहतीमध्ये तीन आणि खारघर व नवीन पनवेल येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला.

Story img Loader