नवी मुंबई : उरण तालुक्यातील पणजे, भेंडखळ आणि बेलपाडा परिसरांतील सुमारे ९०० हेक्टर जमीन ही पाणथळ व खारफुटीने व्यापली गेली असल्याने या क्षेत्राला संरक्षित करण्यात यावे असा एक प्रस्ताव सिडको व रायगड जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. या भागात सुमारे दीड लाख देशी-परदेशी पक्षी विशेषत: फ्लेमिंगो वर्षेभरात अन्नाच्या शोधात येत असल्याचे दिसून आले आहे.

सिडकोने या भागातील एक हजार २५० हेक्टर जमीन यापूर्वीच नवी मुंबई एसईझेड या विशेष आर्थिक क्षेत्र कंपनीला विकलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी संरक्षित क्षेत्र जाहीर झाल्यास या कंपनीची पंचाईत होणार आहे.

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली

उरणमधील पाणथळ व खारफुटी क्षेत्र वाचविण्यात यावे यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी संस्था कार्यरत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे. तरीही या क्षेत्रात भरावाची कामे सुरू आहेत. एसईझेड जमिनीत नुकतीच एक सुरक्षारक्षकासाठी बांधकाम करण्यात आलेले आहे. या भागात बांधकामे होऊ नयेत यासाठी वनविभागही प्रयत्नशील आहे, पण जमिनीची मालक असलेली सिडको व वनविभाग वनविभागाला फारशी दाद देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वनविभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव विरेंद्र तिवारी यांनी नुकतेच उरण तालुक्यातील पणजे, भेंडखळ व बेलपाडा येथील खारफुटी व पाणथळ जमिनीचे क्षेत्र वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे, असा प्रस्ताव सिडको व रायगड विभागाकडे दिला आहे.

उरण तालुक्यात खारफुटीचा नाश होत असल्याने २० गावांत पूरसदृश स्थिती आहे, तर पाणथळ जागेत टाळेबंदीच्या या काळात मोठय़ा प्रमाणात पक्ष्यांचे आगमन झाले असून ते टिकविण्याची आवश्यकता असल्याचे नेटकनेक्टचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.