विकास महाडिक

अठरा कोटींचा खर्च; रविवारपासून कामाला सुरुवात

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात
washim, kinhiraja village, accident, Two Wheeler Collides, Truck Two Killed, One Injured, Sambhajinagar Nagpur Highway,
वाशीम : बंद ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात…. बापलेक जागीच ठार

शहरातील एकमेव ऐतिहासिक वास्तू असलेल्या बेलापूर येथील किल्याच्या पुनर्बाधणीला रविवारपासून सुरुवात होणार असून राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने या किल्ल्यासाठी अठरा कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा त्याच पद्धतीने प्रत्यक्षात उतरविण्याचा हातखंडा असलेल्या एका बांधकाम कंपनीला हे काम देण्यात आले असून तीन वेळा या कामाची फेरनिविदा काढली गेली तरी कंत्राटदार न मिळाल्याने या ऐतिहासिक कामांचा अनुभव असलेल्या कंपनीला सिडकोने काम दिले आहे.

सध्याच्या नवी मुंबईतील (बेलापूर पट्टी) २९ गावांच्या चारही बाजूने खाडीचे पाणी होते. राज्यात आणि गोव्यात त्यावेळी अंमल असलेल्या पोर्तीगीज सरकारने समुद्री सुरक्षेची काळजी घेताना या खाडीकिनारी काही टेहळणीसाठी बुरुज बांधले होते. बेलापूर येथील हा त्यापैकीच एक बुरुज मानला जात आहे. वसई किल्ल्यावर स्वारी करताना या मार्गात आलेला हा बेलापूर येथील किल्लावजा बुरुज चिमाजी आप्पा यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे या किल्ल्यावर पोर्तुगिज आणि पेशवेकालीन वहिवाट असल्याचे इतिहासकारांचे मत आहे.

बेलापूर पट्टीत हा एकमेव बुरुजाचे अंश काल-परवापर्यंत शिल्लक होते, मात्र त्याची डागडुजी करावी, त्यांची पुनर्बाधणी व्हावी यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केले नाहीत.

गड संवर्धन संस्था, गडप्रेमी आणि इतिहासकारांना शहरातील या एकमेव वास्तूचे जतन व्हावे असे वाटत होते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यासमोर मांडला. शहरातील या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे यासाठी सिडकोसारख्या श्रीमंत महामंडळाने काही निधी खर्च केला तर काही बिघडणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे शासनाने सिडकोला या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्बाधणीवर खर्च करण्याचे आदेश दिले असून सिडकोच्या तिजोरीतून १८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची अट सिडकोने घातली आहे.

पर्यटकांसाठी सुविधा

हा किल्ला यापूर्वी होता तसा उभा केला जाणार असून त्यासाठी तत्कालीन दगड वापरला जाणार आहे. केवळ हा किल्याच्या पुनर्रचनेबरोबरच यानंतर हा किल्ला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकासाठी या ठिकाणी कॅफेटिरिया, केऑस, अ‍ॅम्फीथिएटर, ऑडिओ, व्हिडीओ सादरीकरण दाखविले जाणार आहे. पार्किंगची व्यवस्था आणि पर्यटकांसाठी काही क्षण घालवण्यासाठी आजूबाजूला सुशोभीकरण केले जाणार आहे.