नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात १७ मेपर्यंत मद्यविक्रीची सर्व दुकानं बंदच राहणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सोशल मिडियाद्वारे दिली.
त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही महापालिका क्षेत्रातील मद्यविक्रीची दुकानं बंदच राहणार असल्याचे सांगितले. नवी मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
प्रशासनाच्या या निर्णयामुळं मद्य शौकीनांची मात्र निराशा झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच मद्याची दुकानं उघडतील या आशेनं अनेक ग्राहकांनी मद्यांच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र, त्यांना आता १८ मे पर्यंत अजून वाट पहावी लागणार आहे.