शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस संपूर्ण रात्रभर कोसळत होता. या मध्ये शुक्रवारी झालेल्या पावसाची नोंद १०० मिलीमीटर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे उरण मध्ये परतीच्या पावसाने बारा तासात शंभरी पार नोंद झाली आहे.उरणसह अनेक ठिकणी परतीच्या पावसाळा सुरुवात झाली आहे. गुरुवारी व शुक्रवारी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मागील दोन्ही दिवस काळोख करीत अध्ये मध्ये विजेचा कडकडाट ही सुरु होता.मात्र शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पाऊस शनिवारी पहाटे पर्यंत सुरूच होता.

हेही वाचा >>>पनवेल : पोलिसांकडून कळंबोलीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मध्यरात्री पावसाचा जोर वाढला होता. या जोरदार पावसामुळे उरण मधील अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तर काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. उरण तालुक्यात आत्ता पर्यंत २३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही सरासरीच्या १०८ टक्के आहे. उरण मध्ये परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास यावर्षीच्या पावसाची आता पर्यंतच्या झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.

Story img Loader