नवी मुंबई : अटल सागरी सेतूचे उदघाटन आणि त्या नंतर होणाऱ्या सभेसाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमातील १०० बस सुविधा देण्यात आली आहे. शहरातील ठिकठिकाणाहून या बस निघणार आहेत.
न्हावा शेवा ते शिवडी या सागरी सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केले जाणार आहे. त्या नंतर मोदी यांची सभा असून या सभेला जाण्यासाठी नवी मुंबईतून लोकांना जाण्यासाठी एन एम एम टी ने १०० गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यात इलेक्ट्रॉनिक आणि डिझेल गाड्यांचा समावेश असणार आहे. सदर गाड्या नवी मुंबईतील दिघा ऐरोली ते सीबीडी मधून ठिकठिकाणाहून निघणार आहे. यासाठी भाजप नेत्यांशी समन्वय ही साधण्यात आलेला आहे. अशी माहिती एनएमएमटीने दिली आहे.