नवी मुंबईतील शिलोत्तर रायचूर ( सुकपूर) येथील नवीन वसाहतीमध्ये रविवारी नवजीवन गृहनिर्माण सोसायटीच्या तीन मजली इमारतीचे दोन स्लॅब कोसळल्याची घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सूरेश राजभर असे मृत मुलाचे नाव आहे.
हेही वाचा- उरण: खवय्ये घेताहेत गारव्यात वाफाळलेल्या पोपटीचा स्वाद; शाकाहारी व मांसाहारी पोपटी
तीन मजल्यांची नवजीवन ही इमारत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांचे स्लॅब कोसळल्याने ही जिवीतहानी झाली. ज्यावेळेस इमारतीमधील स्लॅबचा काही भाग कोसळला त्यावेळेस इमारतीमध्ये तीन कुटूंबे राहत होती. इतरांनी वेळीच धावपळ केल्याने त्यांचे प्राण वाचले. राजभर कुटूंब राहत असलेल्या शयनकक्षात शुभम झोपला होता. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. वेळीच येथील स्लॅबचा कोसळलेला भागाच्या ढिगा-यातून शूभमला बाहेर काढण्यात आले. शुभमच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा नैना परिसरात वाढलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामांविषयी चर्चा सूरु आहे. २०२८ सालपासून नवजीवन ही इमारत सूकापूर ग्रामपंयातीने धोकादायक घोषित केली होती. याबाबत रितसर घोषणापत्र व सर्व सरकारी अधिका-यांना ग्रामपंयातीच्या ग्रावविकास अधिका-यांना कळविले होते. त्यानंतर ही घटना घडली. महसूल विभागाचे एक पथक या घटनेची चौकशी सोमवारी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते.