पनवेल ः मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १४.७९ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी पहिल्या सत्रात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ५.२३ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर उन्हाचा पारा चढू लागल्यानंतर मतदारांची संख्या काही अंशी कमी होतानाचे चित्र पनवेलमध्ये आहे. 

पनवेल विधानसभा क्षेत्रात ५ लाख ९१ हजार ३९८ मतदारांमध्ये ३ लाख १७ हजार ९६ पुरुष तर २ लाख ७४ हजार २३१ मतदार स्त्रीया आहेत. यापैकी सकाळी अकरा वाजेपर्यंत ४८,५२५ पुरुष आणि ३९,९६६ स्त्री मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी अकरा वाजेपर्यंत ८७ हजार ४९१ मतदारांनी मतदान केल्यामुळे दुपारच्या सत्रात एक ते तीन वाजेपर्यंत कमी मतदान होईल असे चित्र होते. 

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
yavatmal political parties campaigning
यवतमाळ: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….
mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

हेही वाचा – निवडणुकीच्या धामधुमीत पाणथळींवर अतिक्रमण

उन्हाच्या झळा मतदारांना सोमवारी मतदान होईपर्यंत लागू नये यासाठी मतदान बूथपर्यंत आलेल्या मतदारांसाठी काही राजकीय पक्षांनी तीन आसनी रिक्षांची सोय केल्याचे पाहायला मिळाले. अनेक मतदारांनी घर ते मतदान केंद्रापर्यंत चालत जाऊन मतदान केले. उन्हाच्या झळा मतदान बूथवर बसलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना लागू नये म्हणून पनवेलमध्ये बूथवरील कार्यकर्त्यांना कांदा पोहे, उपमा, चहा आणि वडापावची सोय करण्यात आली होती. तसेच दुपारी बूथमध्ये बसणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह थंडपेय फ्रुटीची सोय करण्यात आली होती. बंदोबस्तावरील महिला पोलिसांसाठी स्वच्छतागृहाची विशेष काही सोय केल्याचे दिसले नाही. 

हेही वाचा – मोबाईलसह मतदान केंद्रात प्रवेशबंदीवरुन अनेक ठिकाणी पोलीस व मतदारांमध्ये वाद

मतदारांचा गोंधळ

एकाच मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या यादीत असल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. निवडणूक आयोगाचे कर्मचारी पनवेलमधील ५४४ मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध होते. परंतु मतदारांची नावे दुबार असणे आणि काही मतदारांची ओळखपत्र असतानाही त्यांची नावे यादीतून गायब होणे या तक्रारींमुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी नाराजी व्यक्त केली.