लोकसत्ता टीम
पनवेल : खांदेश्वर येथील एका ४५ वर्षीय अभियंत्याची १५ लाख रुपयांची फसवणूक ऑनलाईन गुंवतणूकीव्दारे झाली आहे. जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान ही फसवणूक झाली आहे.
खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ६ मधील निललेक व्ह्यू या इमारतीमध्ये फसगत झालेला अभियंता राहतो. जानेवारी महिन्यात या अभियंत्याच्या मोबाईलवरील टेलिग्राम अॅपवर BUCCA_msk खात्यावरुन फ्यूचर फोरच्युन ग्लोबल या खात्यावर फोरेक्स ट्रेडींगची माहिती मिळाली. विश्वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी संबंधित अभियंत्याच्या खात्यामध्ये चार हजार रुपये पाठवले.
आणखी वाचा-आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू… नैसर्गिक की हत्या? चौकशीची मागणी
गुंतवणूकीमध्ये लाभ झाल्याने या अभियंत्याने विविध १० बँकांच्या खात्यामध्ये १५ लाख ६ हजार ६५७ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसात अभियंत्याला त्याची फसवणूक झाल्याचे समजले. सध्या याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.