नवी मुंबई : येथील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील जवळजवळ १५ हजार मतदार आपापल्या गृहसंकुलातील मतदान केंद्रांवरच मतदान करणार आहेत. मतदान केंद्राची सुविधा निवडणूक आयोगातर्फे संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या आवारात केली जाणार आहे.

बेलापूर मतदारसंघातील १२ व ऐरोली मतदारसंघातील दोन गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान करण्याची तयारी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. एकूण चौदा मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या जवळपास १५ हजार इतकी आहे. बेलापूर विधानसभा मतदार केंद्रात १२ गृहसंकुलांमध्ये मतदानाची सुविधा असणार असून तेथे २५ मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत. तर ऐरोलीत दोन गृहसंकुलांमध्ये प्रत्येकी ३ असे सहा मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत.

maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, “राहुल गांधी संविधान बचाओच्या घोषणा करतात पण त्यांच्या हातातल्या लाल पुस्तकात..”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Vijay chougule vs bjp ganesh naik
ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?

हेही वाचा – नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ

बेलापूर विभागात एसबीआय कॉलनी, एनआरआय कॉप्लेक्स तसेच एल अ‍ॅण्ड टी सीवूड्स येथे मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. एक हजारपेक्षा अधिक मतदार आहेत अशा सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.

बेलापूर विधानसभा मतदारसंघात १२ सोसायट्यांमध्ये २५ बुथ तयार करण्यात येणार असून तेथील नागरिकांना सोसायटीतच मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमावलीनुसार योग्य ती सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. – डॉ. कैलास गायकवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी, बेलापूर मतदारसंघ

हेही वाचा – घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत

ऐरोली मतदारसंघात दोन सोसायट्यांमध्येच मतदानाची सुविधा सोसायटीच्या पूर्वपरवानगीने नियोजित केली असून त्या ठिकाणी २ मतदान बूथ असतील. सोसायटीतील नागरिकांना या ठिकाणी मतदान करता येणार आहे. – सुचिता भिकाणे, निवडणूक अधिकारी, ऐरोली मतदारसंघ

Story img Loader