१५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे

बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील जवळजवळ १५ हजार मतदार आपापल्या गृहसंकुलातील मतदान केंद्रांवरच मतदान करणार आहेत.

Belapur, Airoli, voters, society Belapur,
१५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : येथील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील जवळजवळ १५ हजार मतदार आपापल्या गृहसंकुलातील मतदान केंद्रांवरच मतदान करणार आहेत. मतदान केंद्राची सुविधा निवडणूक आयोगातर्फे संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या आवारात केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेलापूर मतदारसंघातील १२ व ऐरोली मतदारसंघातील दोन गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान करण्याची तयारी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. एकूण चौदा मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या जवळपास १५ हजार इतकी आहे. बेलापूर विधानसभा मतदार केंद्रात १२ गृहसंकुलांमध्ये मतदानाची सुविधा असणार असून तेथे २५ मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत. तर ऐरोलीत दोन गृहसंकुलांमध्ये प्रत्येकी ३ असे सहा मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत.

हेही वाचा – नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ

बेलापूर विभागात एसबीआय कॉलनी, एनआरआय कॉप्लेक्स तसेच एल अ‍ॅण्ड टी सीवूड्स येथे मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. एक हजारपेक्षा अधिक मतदार आहेत अशा सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.

बेलापूर विधानसभा मतदारसंघात १२ सोसायट्यांमध्ये २५ बुथ तयार करण्यात येणार असून तेथील नागरिकांना सोसायटीतच मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमावलीनुसार योग्य ती सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. – डॉ. कैलास गायकवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी, बेलापूर मतदारसंघ

हेही वाचा – घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत

ऐरोली मतदारसंघात दोन सोसायट्यांमध्येच मतदानाची सुविधा सोसायटीच्या पूर्वपरवानगीने नियोजित केली असून त्या ठिकाणी २ मतदान बूथ असतील. सोसायटीतील नागरिकांना या ठिकाणी मतदान करता येणार आहे. – सुचिता भिकाणे, निवडणूक अधिकारी, ऐरोली मतदारसंघ

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 15 thousand voters voting in the society 12 centers in belapur and 2 centers in airoli ssb

First published on: 07-11-2024 at 15:46 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा