नवी मुंबईत थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ घेणाऱ्या १६ जणांना अटक केली आहे यात १० पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. ही कारवाई खारघर येथे करण्यात आली आहे.
हेही वाचा- आर्थिक फसवणुकीचे आरोप वरूण सरदेसाई यांनी फेटाळले
सरत्या वर्षात एकाच वेळी एवढ्या लोकांवर कारवाईचा हा उचांग आहे. खारघर सेक्टर १३ येथील एका इमारत काही नायझेरियन नागरिक राहतात. त्यांच्या संशयास्पद हालचाली बाबत एका खबरीने गुन्हे शाखेला माहिती दिली होती त्या अनुषंगाने आज (शनिवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास खारघर सेक्टर १२ येथील सदनिकेत धाड टाकली असता हा प्रकार समोर आला. त्यांच्या कडून सव्वा कोटी रुपयांचा अंमली पदार्थ आणि गांजाही आढळून आला आहे. ही त्याची अंदाजे मोजदाद आहे. अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- पुणे : धनकवडीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला
त्यांना अंमली पदार्थ आणि एवढ्या मोठया प्रमाणात गांजा कुठून मिळाला कोणी दिला या बाबत आताच सांगता येणार नाही असे सांगण्यात आले.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई व आसपास राहणारे हे लोक या ठिकाणी एकत्र जमले होते.अटक करण्यात आलेल्या लोकांची गुन्हेगारी वा अंमली पदार्थ समंधी काय पार्श्वभूमी आहे तसेच ते भारतात कायद्यानुसार राहतात की बेकायदा आदी बाबतीत तपास करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.