नवी मुंबई : वाशीच्या एपीएमसी बाजारात शनिवारी कोकणातील हापूस आंब्याच्या तब्बल १७५ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत . गेल्या काही दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या दाखल होत होत्या. परंतु आज शनिवारी यंदाच्या हंगामातील हापूसची अधिक आवक झाली आहे. बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे . यावर्षी हापुसचे उत्पादन चांगले असेल, मात्र हंगामाला उशिराने सुरुवात होईल असे मत हापूस बागायतदार यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी हापूस आंब्याचा खरा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो. यंदा हवामान बदल, कडाक्याची थंडी यामुळे सुरुवातीचा मोहोरला फाळधारणा झाली नाही तर काही मोहोर गळून पडला. थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावाचा ही फटका बसला त्यामुळे, औषधीफवारणी खर्च वाढला. त्यामुळे बाजारात सध्या फेब्रुवारी महिना उजडला तरी हापूसची आवक कमी होत आहे. त्यामुळे खवय्यांना हापूसची चव चाखण्यासाठी १५ मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मागील आठवड्यात हापूसच्या २४पेट्या दाखल झाल्या होत्या तेव्हा १०-१५हजार रुपयांनी पेटीची विक्री झाली आहे.आज शनिवारी दाखल झालेल्या हापूसच्या ऐका पेटीतील ४ ते ६ डझनला ७ हजार ते १२ हजार रुपये बाजारभावाने विक्री झाले आहे.
शनिवारी एपीएमसीत हापूसच्या १७५ पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदाच्या हंगामातला आत्तापर्यंतची अधिक आवक झाली आहे. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होण्यास सुरुवात होईल. सध्या बाजारात हापूस ४ ते ६ डझनाच्या पेटीला ७ ते १२ हजार रुपये दराने विक्री होत आहे. संजय पानसरे ,संचालक , फळबाजार समिती
© The Indian Express (P) Ltd