द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील घरे उपलब्ध

नवी मुंबई</strong> : दोन दिवसांवर आलेल्या होळीत्सोवाच्या निमित्ताने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम सिडकोच्या वतीने केले जाणार असून केवळ तळोजा येथील ५७३० घरांच्या सोडतीत आणखी १९०५ घरांची भर घालून सिडकोने एकूण ६ हजार ५०८घरांचा होळी धमाका जाहीर केला आहे.

विशेष म्हणजे नव्याने जाहीर करण्यात आलेली घरे ही द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा या पाच नोडमधील घरांची विक्री जाहीर करण्यात आलेली आहे.

सिडकोच्या वतीने २६ जानेवारी रोजी ५७३० घरांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे सर्व घरे नवी मुंबईच्या दक्षिण भागात जलद गतीने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये आहेत. या ५७३० घरांव्यतिरिक्त सिडकोने आता द्रोणागिरी (१८१), घणसोली (१२), कळंबोली (४८), खारघर (१२९) आणि तळोजा येथे १५३५ अशा एकूण १९०५ अधिक घरांची अर्ज विक्री सुरू केली आहे. होळीच्या दोन दिवस अगोदर सिडकोने ही घोषणा करून केवळ तळोजा पर्याय असल्याने निराश झालेल्या ग्राहकांसाठी आता आणखी चार नोडमधील घरांचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे.

२०१८ व २०१९ मधील सिडकोच्या  सोडतीतील घरांची ताबा प्रक्रीया अजूनही सुरूच असून अनेकांनी यातील घरे नाकारली आहेत. ती घर विक्री झाल्यानंतर सडको नवीन घरांची घोषणा करणार आहे.

नोड निवडण्याचा पर्याय

या नवीन १९०५ घरांमुळे सर्वसामान्य संवर्गातील ग्राहकांना संधी उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी व सोडत होणार आहे. अर्ज दाखल, सर्व कागदपत्र आणि अनामत रकमेचा भरणा हा ऑनलाइन करावा लागणार असून या सोडतीत नोड निवडण्याचा पर्याय ग्राहकांना खुला ठेवण्यात आलेला नाही. वाढीव घरांसाठी इतर अर्ज प्रक्रिया ही जुनी राहणार असल्याचे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader