पनवेल: पॅनकार्ड बँकखात्यासोबत लींक करण्यासाठी केंद्र सरकार जनजागृती करत आहे. परंतू याच जनजागृतीच्या आडून काही भामटे बँक खातेधारकांची ऑनलाईन फसवणूक करत आहेत. ३५ वर्षीय महिला पोस्ट कार्यालयात कामाला आहेत. त्या करंजाडे वसाहतीमध्ये राहतात. त्यांचे एक्सीस बँकेत खाते असल्याने त्यांनी बँकेत पासबूकवर तशी नोंद करुन आणली. परंतू त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना फोनवरुन बँकतून बोलत असल्याचे सांगून एका भामट्याने संपर्क साधला.
पॅनकार्ड खात्याशी जोडण्यासाठी संबंधित भामट्याने पी़डीत महिलेच्या मोबाइल फोनवर लींक पाठवून एक्सीस बँकेच्या खात्यासोबत पॅनकार्ड लींक करण्याचे सूचविले. काही सेकंदात संबंधित महिलेच्या खात्यामधील २ लाख ७२ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांना कळाले. तक्रारदार महिलेने एक्सीस बँकेतील कर्मचा-यांकडे संपर्क साधला मात्र बँक कर्मचा-यांनी कस्टमर केअरवर संपर्क साधण्याचा सल्ला देत इतर कोणतीही कारवाई तातडीने केली नाही. या प्रकरणात पनवेल शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीने २ लाख ७२ हजार चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.