या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत शुक्रवारी दिवसभरात करोनाबाधित २० रुग्ण आढळल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या २५० झाली आहे. शुक्रवारी आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी १४ जण हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) आहेत.

याशिवाय कोपरखैरणे आणि जुईनगर येथे राहणाऱ्या आणि मुंबईत बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिसांचाही यात समावेश आहे. शुक्रवारी वाशी येथे तीन, तुर्भेमध्ये सात, कोपरखैरणेत सहा, तर नेरुळमध्ये चार रुग्ण आढळल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

..तर फौजदारी गुन्हा

पालिका क्षेत्रात मास्क न लावता घराबाहेर पडल्यास ५००, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार, सामाजिक अंतर न ठेवल्यास ग्राहकाला २००, तर दुकान मालकाला दोन हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याशिवाय या सर्व प्रकारांसाठी दोनदा सापडल्यास फौजदारी गुन्हाही दाखल करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.