Navi Mumbai Girl Murder : नवी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवल राहणाऱ्या यशश्रीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती. गुरुवारी (दि. २५ जुलै) सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडुपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
man killed his wife and son and create faked suicide
मुंबई : पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचला, आरोपीला अटक
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
boy studying in class 10 killed his father with help of his mother in Hudkeshwar police station limits
गृहमंत्र्यांच्या शहरातील हत्याकांडाचे सत्र थांबता थांबेना, मुलाने आईच्या मदतीने केला वडिलाचा खून; मृतदेह पोत्यात भरुन…

हे वाचा >> उरणमध्ये निर्भयाची क्रूर हत्या, नागरीक संतप्त; आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह न घेण्याची कुटुंबाची भूमिका

पोलिसांनी मृतदेह अतिशय विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांनाही संशय आहे.

हे ही वाचा >> नवी मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या, तीन आरोपींना अटक

वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सात पथके तयार करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

ताजी अपडेट

संशयित आरोपी बंगळुरू येथील असल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनी आरोपीला नुकतेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे.

Story img Loader