राज्याच्या वन विभागाने उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, गोवठणे,जुई,जसखार, धुतुम,भोम,चिखली भोम,पिरकोन, धसाखोशी,वशेणी, विंधणे,पागोटे,पौंडखार,भेंडखळ, नवघर व वालटी खार या १७ गावांच्या हद्दीतील २ हजार २०० हेक्टर खारफुटीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी वन विभागाकडे देण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या खारफुटीचे जतन होणार आहे. खारफुटींना मुंबई उच्च न्यायालयाच्या समुद्री वनस्पतींना संरक्षित जंगलांच्या स्वरुपात वाचविण्यासाठी दिलेल्या आदेशाप्रमाणे जतनासाठी वन विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहे.

हेही वाचा- हेवी डिपॉजिटवर घर घेताय? सावधान… एकच घर अनेकांना दाखवत केली तब्बल ४४ लाखांची फसवणूक

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

जतन करायच्या या खारफुटींचे उरणमधले क्षेत्र सुमारे २२०० पेक्षा जास्त हेक्टरांचे म्हणजेच अंदाजे २२० आझाद मैदानांना सामावून घेण्याएवढे आहे. रायगड जिल्ह्यातल्या उरण मधील प्रक्रियेचे स्वागत करताना नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार म्हणाले नवी मुंबई सेझच्या अंतर्गत असलेल्या १,२५० हेक्टरांपैकी बहुतांश भाग एकतर खारफुटींच्या किंवा पाणथळ क्षेत्रांच्या अंतर्गत येतो. याची देखील दखल घेतली जाणे आवश्यक आहे. या समुद्री वनस्पतींच्या स्थानांतरणात होणा-या उशीरामुळे व्यापक विध्वंस होऊ शकतो, असे ते पुढे म्हणाले. नवी मुंबई सेझमध्ये सिडकोचा २६% वाटा असल्यामुळे , सिडको देखील या क्षतीला तेवढीच जवाबदार आहे, असे कुमार यांनी निदर्शनास आणून दिले.
या आधी महसूल विभागाने वन विभागाला २०१५मध्ये २५ हेक्टरांहून जास्त सुपूर्दगी केली होती आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये ४२ हेक्टर आणि जुलैमध्ये ११०० हेक्टर स्थानांतरणाची सूचना देण्यात आली होती असे वन अधिका-यांनी सांगितले. या व्यतिरिक्त जेएनपीटीने ८१४ हेक्टरांहून जास्त खारफुटींची सुपूर्दगी केली.

हेही वाचा- नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी बनवले विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

अधिकारी म्हणाले ३०० हेक्टर्स एवढ्या खारफुटी बहुतांशपणे सिंचन न झालेल्या शेत जमिनींवर असून त्यांची सिडकोने दखल घेणे अजून बाकी आहे. याबद्दल स्थानिक शेतक-यांसोबत मतभेद आहेत. या दरम्यान वनशक्तीची समुद्री शाखा असलेल्या सागरशक्तीचे नंदकुमार पवार यांनी जेएनपीटीने देखील आपल्या जवळ सुमारे १०० हेक्टर खारफुटी ठेवल्या आहेत. यांना देखील वन खात्याला सुपूर्द करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.