पनवेल: ट्रेडींग अॅपमध्ये खाते खोलायच्या बहाण्याने कामोठे उपनगरातील एका ६६ वर्षीय व्यक्तीला तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा चोरट्यांनी घातला आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामोठे परिसरात सेक्टर २० येथील एव्हीन्युव सोसायटीत ६६ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी राहतात. त्यांना ऑनलाईन भामट्यांनी ३ ऑक्टोबरपासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधून ट्रेडींग अॅपवर खाते खोलून ट्रेडींग केल्यास मोठ्या नफ्याचे आमिष मिळेल असे सांगीतल्यामुळे पिडीत जेष्ठ नागरिकानी आर.जी.ए.आर.ए. या अॅपवर खाते उघडले. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन पिडीत जेष्ठांना संपर्क साधण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यासाठी सांगीतले. परंतू वेळोवेळी मागणी करुनही नफा न मिळाल्याने मूळ रक्कम परत करण्याची मागणी केल्यानंतर ऑनलाईन भामट्यांचे मोबाईल क्रमांक बंद झाल्याने या जेष्ठांनी कामोठे पोलीसांना संपर्क साधला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 lakh online fraud of senior citizens kamothe panvel crime news amy