रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम; स्वयंरोजगारासोबतच पाल्यांच्या सुरक्षेलाही हातभार
महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेने वाहनचालक प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. गेले सहा महिने हा उपक्रम सुरू आहे. आजवर रायगड जिल्ह्य़ातील २५० महिलांनी चालक प्रशिक्षण घेतल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती प्रिया मुकादम यांनी दिली. शहरात स्वत:च्या मुला-मुलींना महिलांना शाळेपर्यंत सुरक्षितरीत्या सोडता यावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या.
या योजनेचा सर्वाधिक लाभ शहरातील महिलांना झाला आहे. पनवेल तालुक्यातील १२० आणि उरण तालुक्यातील ५० महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेत एकूण ५०० महिलांना प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. यासाठी संबंधित महिलांना सुरुवातीला ५०० रुपये भरायचे आहेत. उर्वरित साडेचार हजार रुपये जिल्हा परिषद देणार आहे. महिलांना प्रत्येक विभागात सक्षमरीत्या उभे करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. याच धोरणातून जिल्हाभरातील किमान ५०० महिलांना वाहनचालकांचे प्रशिक्षण देण्याची संकल्पना जिल्हा परिषदेच्या सभागृहातील सदस्यांनी मंजूर करून घेतली. जिल्ह्य़ातील सर्वाधिक शहरीभाग हा पनवेल तालुक्यात असल्याने या योजनेचा सर्वाधिक लाभ येथील महिलांनी घेणे गरजेचे असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
संबंधित योजनेत सहभागी होण्यासाठी या महिला रायगड जिल्ह्य़ात वास्तव्यास असून तिचे शिक्षण किमान आठवी पास असावे, आधारकार्ड, पॅनकार्ड यांच्यासह संबंधित महिलेने अर्ज भरून योजनेचे शुल्क पाचशे रुपये भरल्यावर त्या महिलेच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होतील.
याच पाच हजार रुपयांनी संबंधित महिलेने आपल्या नजीकच्या चालक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घ्यायचे, अशी ही योजना आहे. संपर्क- ९३२४८७६८८०.

योजनेसाठी अटी व नियम
संबंधित योजनेत सहभागी होण्यासाठी या महिला रायगड जिल्ह्य़ात वास्तव्यास असून तिचे शिक्षण किमान आठवी पास असावे, आधारकार्ड, पॅनकार्ड यांच्यासह संबंधित महिलेने अर्ज भरून योजनेचे शुल्क पाचशे रुपये भरल्यावर त्या महिलेच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होतील. याच पाच हजार रुपयांनी संबंधित महिलेने आपल्या नजीकच्या चालक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घ्यायचे, अशी ही योजना आहे.

Story img Loader