दहा स्थानकांचे काम, रोहा-वीर दुपदरीकरण, विद्युतीकरण दोन वर्षांत 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : दोन वर्षांत कोकण रेल्वेचे रूपडे पालटणार आहे. दहा रेल्वे स्थानके, रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण आणि संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईत वाशी येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी ही माहिती दिली. रोहा-वीर या ४६ किमी मार्गाचे दुपदरीकरण डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कलंबणी, कडवई, वेरवली, खारेपाटण, अर्चिणे, मिर्जान, इन्नन्जे या १० नव्या रेल्वेस्थानकांचे काम आणि आठ पुलांचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. ११०० कोटी रुपयांचे हे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण आणि कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी रेल्वे मंत्रालय व इतर चार राज्याकंडून ३१० करोड रुपये मिळाले आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गोव्यामध्ये मडगाव, करमाळी आणि थिवीम स्टेशनला वेगळ्या पर्यटन सुविधा देण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्याचबरोबर मालवाहतुकीलाही प्राधान्य देण्यात येत असून मंगलोर रिफायनरी व पेट्रोकेमिकल्ससाठी एक रेल्वे सायडिंग बनवण्याचे काम सुरू आहे.  गोव्यामध्ये मॉडेल लॉजिस्टिक पार्कचे कामही प्रगतिपथावर आहे, असे गुप्ता म्हणाले.

नफा दुप्पट : कोकण रेल्वेला २०१६-१७ मध्ये ६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यामध्ये यंदा १०० टक्के वाढ झाली. २०१७-१८ या वर्षांत १२६ कोटी रुपयांचा नफा झाल्याची आणि भारत-नेपाळ दरम्यानच्या रक्सौल-काठमांडू या महत्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम कोकण रेल्वेला मिळाल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली.

स्वयंचलित गाडी परीक्षण : कोकण रेल्वेने स्वयंचलित गाडी परीक्षणाची अभिनव प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली रत्नागिरी आणि वेर्णा स्टेशनवर बसवण्यात आली आहे. तसेच ही प्रणाली रेल्वेच्या नागपूर विभागातही बसविण्यात येणार आहे.

* रोहा-वीर या ४६ किमी मार्गाचे दुपदरीकरण डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण  ल्ल  इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कलंबणी, कडवई, वेरवली, खारेपाटणसह १० नवी रेल्वेस्थानकांचे काम सुरू

* आठ पुलांचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार