नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ गावात राहणाऱ्या चिराग लोके या तीस वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. यातील आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून मयत आणि त्याचे मारेकरी दोन्ही अभिलेखवरील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. नेरुळ गावात राहणाऱ्या चिराग लोके याची राहत्या घराच्या सोसायटी पार्किंग मध्ये हत्या करण्यात आली. त्याच्या डोक्यात लोखंडी सळई ने वार केल्याने तो जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पनवेल : ३०० हून अधिक हॉटेलांची सुरक्षा वाऱ्यावर

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्याची बायको त्याच्या समवेत होती तिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र मारेकऱ्यांना तिलाही मारहाण केली त्यात ती सुद्धा जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास घडली. मयत चिराग हा त्याच्या मुलास शाळेतून घरी आणण्यास पत्नी समवेत गेला होता. मुलाला घरी आणल्यावर सोसायटी पार्किंग मध्ये तो गाडी लावत होता . तर मुलगा घरी गेला. गाडी लावताना काही लोक तिथेआले त्यांची आणि चिराग यांची बाचाबाची झाली. आणि काही कळण्याच्या आत त्यांनी चिराग याला जबर मारहाण सुरू केली होती. चिराग हा सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी चा असून त्याच्या विरोधात संघटित गुन्हेगारी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. आरोपी निष्पन्न झाले असून लवकरच ते गजाआड असतील विश्वास त्यांनी व्यक्त केला.