पूनम सकपाळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई : वाशीच्या एपीएमसी बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस आंब्याच्या तब्बल ३८ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या . गेल्या काही दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या दाखल होत होत्या. परंतु आज गुरुवारी यंदाच्या हंगामातील हापूसची अधिक आवक झाली आहे. बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे . यावर्षी हापुसचे उत्पादन चांगले असेल, मात्र हंगामाला उशिराने सुरुवात होईल असे मत हापूस बागायतदार यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी हापूस आंब्याचा खरा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो. यंदाही पाऊस आणि थंडी लांबल्याने हापूस उत्पादनास विलंब झाला आहे. त्यामुळे बाजारात सध्या फेब्रुवारी महिना उजडला तरी हापूसची आवक कमी होत आहे. त्यामुळे खवय्यांना हापूसची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये एपीएमसी बाजारात दोन डझन हापुसची पाहिली पेटी दाखल झाली होती. त्यावेळी दोन डझनाला ९ हजार रुपये दर मिळाला होता. आज गुरुवारी दाखल झालेल्या हापूसच्या ऐका पेटीतील ४ ते ८ डझनला ५ हजार ते १० हजार रुपये बाजारभावाने विक्री झाले असून, पिकलेल्या हापूसच्या पेटीला १२ ते १५ हजार रुपयांनी विक्री झाली आहे.
हेही वाचा >>> ‘स्कूल व्हिजन’ दूरच ‘स्कूल बस’ सुद्धा न पोहचलेले गाव बोनसारी
यंदा हापुसची आवक चांगली आवक होणार असून हंगामाला मात्र विलंब होणार आहे. मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्या महिन्यात जवळ जवळ एक लाख पेट्या विक्रीसाठी येत असतात. सध्या बाजारात देवगड बरोबर रायगड आणि कर्नाटकमधील हापूस देखील बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या कर्नाटक आणि रायगड हापूसला घाऊक बाजारात प्रतिकिलो ४५० रुपये हुन अधिक दराने विक्री होत आहे.
गुरुवारी एपीएमसीत हापूसच्या ३८ पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदाच्या हंगामातला आत्तापर्यंतची अधिक आवक झाली आहे. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होण्यास सुरुवात होईल. सध्या बाजारात हापूस ४ ते ८ डझनाच्या पेटीला ५ ते १० हजार रुपये दराने विक्री होत आहे.
-संजय पानसरे, संचालक, फळबाजार समिती