नवी मुंबई- शीव पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका ते सी.बी.डी. बेलापूर हा भाग नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून या मार्गावरील बेलापूर येथील २ तसेच नेरुळ व वाशी येथील पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत.त्यामुळे आगामी काळात या उड्डाणपुलावरील जाहीरात हक्कही पालिकेला मिळावेत यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
हेही वाचा- चिरनेर परिसरात हेटवणे जलवाहिनीला गळती; नवी मुंबईतील पाणी पुरवठा बंद
शीव पनवेल महामार्गावरील दिवाबत्ती तसेच पावसाळ्यात सातत्याने पडणारे खड्डे यामुळे शासनाचे रस्ते व उड्डाणपुल परंतू त्यांच्या दुरावस्थेविषयी नवी मुंबई महापालिकेचे नाव बदनाम होत असे. त्यामुळे तत्कालिन आयुक्त डॉ.एन.रामास्वामी तसेच अभिजीत बांगर यांनी रस्त्याच्या दूरवस्थेविषयी ,सततच्या दिवाबत्ती विषयी प्रवाशी, नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस दोष दिला जात होता. याचा परिणाम नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेवर सातत्याने होत असे. त्यामुळे ९ डिसेंबर २०२१ ला पालिकेकडे या मार्गावरील दिवाबत्ती हस्तातंरीत करण्यात आल्यानंतर पालिकेकडन हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या कामासाठी १०.५४ कोटी खर्चातून महामार्गावरील एलईडी दिवाबत्ती लावली जात आहे.एलईडी दिव्यांमुळे वीजबचत होणार असून सातत्याने महामार्गावर होणारी पथदिव्यांची डोळेमिचकावणी बंद होणार आहे. दिवाबत्ती हस्तांतरित करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ कोटी २९ लाखांची रक्कम पालिकेने प्रदान केली आहे.परंतू आर्थिक बोजा पालिका उचलत असताना विद्युत खांब्यावरील जाहीरात हक्कही प्राप्त होणे आवश्यक आहे. आता एमएसआरडीसीच्या बेलापूर येथील २ तसेच ,नेरुळ वाशी असे ४ उड्डाणपुल पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत.
हेही वाचा- रायगड : जेएनपीटी – पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर दोन डंपरच्या धडकेत चालकाचा मृत्यू
नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणारे बेलापूर येथील २ उड्डाणपुल तसेच वाशी व नेरुळ एलपी येथील उड्डाणपुल पालिकेकडे हस्तांतरीत झालेले आहेत. त्यामुळे आता उड्डाणपुलाची देखभाल दुरुस्ती पालिकेकडे राहणार असून सध्या याच महामार्गावरील उड्डाणपुलापैकी नेरुळ एलपी तसेच बेलापूर येथील उड्डाणपुलावरील कॉंक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहेत. नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेत देशात ३ क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहर देखणे पण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलांची व दिवाबत्तीची दुरावस्था असे चित्र अनेक वेळा पाहायला मिळत होते. परंतू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४ उड्डाणपुल पालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गावरील उड्डाणपुलांची काळजी पालिकेला घ्यावी लागणार आहे.
पालिका हद्दीतील महामार्गावरील ४ उड्डाणपुल पालिकेकडे हस्तातंरीत झाले आहेत. यातील नेरुळ ,बेलापूर येथील उड्डाणपुलाच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरु असून या उड्डाणपुलावरील जाहीरात हक्कही पालिकेकडे मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
मुंबई शहर व परिसरातील एम एम आर रिझन मध्ये तत्कालीन मंत्री व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ५५ उड्डाणपूल बांधण्यात आले होते आता ज्या ज्या महापालिकांच्या क्षेत्रामध्ये हे उड्डाणपूल आहेत ते त्या त्या महापालिकांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ही एमएसआरडीसी मार्फत बांधण्यात आलेले चार उड्डाणपूल नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत .