नवी मुंबई: नेरुळ सेक्टर ४ येथे रविवारी सायंकाळी ७.२० च्या दरम्यान चालत्या गाडीवर झाड पडल्याने दुर्घटना घडली. सुदैवाने या गाडीतील चौघांचे प्राण वाचले असून त्यातील एक जण जखमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी असलेले जरांडे कुटुंबीय आपल्या एस क्रॉस या गाडीतून नेरूळकडे जात असताना पामबीच मार्गावरून गाडी सारसोळेच्या दिशेने नेरूळ राजीव गांधी उड्डाणपूल मार्गाकडे जात असताना सेक्टर ४ येथे विक्रम बारच्या विरुद्ध दिशेच्या मार्गावर चालत्या गाडीवर मोठे झाड कोसळल्याने सायंकाळी दुर्घटना घडली. यावेळी गाडीमध्ये चौघेजण होते.

हेही वाचा… नवी मुंबई: रस्ते गेले वाहून..

अपघातात गाडीमधील एकाच्या डोक्याला मार लागला असल्याने जखमीला एमजीएम वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महादेव पवार यांनी दिली. दुभाजकामधील झाड कोसळल्यामुळे ही घडली असून नशीब बलवत्तर म्हणून इतरांचे प्राण वाचले असल्याचे चित्र आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 people narrowly escape as a tree fell on a moving car at nerul sector 4 dvr