नवी मुंबई : कुख्यात संघटीत गुन्हेगार विक्रांत देशमुख यांच्या टोळीतील साथीदारास नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता.
राकेश जनार्दन कोळी असे अटक आरोपीचे नाव आहे. तो विकी देशमुख उर्फ विक्रांत देशमुख टोळीतील सदस्य आहे. अपहरण, बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, असे अनेक गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. शिवाय महाराष्ट संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विकी देशमुख टोळीतील एका सदस्यांची हत्या करण्यातही त्याचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
आणखी वाचा-नवी मुंबईतील हरित पट्ट्यावर नवे नगर; शिळच्या सीमेलगत नागरी वसाहतींचा मार्ग मोकळा
गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता. उरण गव्हाणपाडा, जेएनपीटी , पनवेल परिसरात या टोळीची दहशद होती. विकी देशमुखच्या टोळीतील त्याच्या सहित १० पेक्षा जास्त आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. मात्र राकेश पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रविवारी तो गव्हाण फाटा परिसरात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी.जी. देवडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तात्काळ पथक पाठवले. या पथकाने सापळा रचून राकेश याला अटक केली आहे.