नवी मुंबईत केवळ घरांच्या किमतीच नाही तर घरभाडे दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे एकरकमी मोठी रक्कम देऊन घर भाड्याने घेणाऱ्यांची संख्या वाढत आहेत मात्र अशांचा गैरफायदा घेत वाशीतील एक घर दाखवून अनेकांना लुबाडण्यात आले आहे. या सर्वांनी ४४ लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी
कोपरखैरणे येथे राहणाऱ्या सपना पाल यांना घर भाड्याने घ्यावयाचे होते यासाठी त्यांनी एजंट असलेले नसरीन शेख व अन्य काहींशी संपर्क साधला. एजंटने त्यांना बी.२ टाईप अपार्टमेंट घर ब्लॉक क्रमांक १२ सदनिका क्रमांक ४ हि दाखवण्यात आली . पाल यांना हे घर पसंत पडले त्यांनी यासाठी १५ लाखांची रक्कम दिली. हि घटना २०१९ मध्ये घडली. मात्र त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून एजंट टाळाटाळ करीत होते. हीच सदनिका इतर अनेकांना हेवी डिपॉजिट वर भाड्याने दिल्याचेही समोर आले . त्यामुळे सर्वांनी मिळून एजंट नसरीन शेख, रेश्मा सरवय्या, शकिरा मिरजकर, अभय गायकवाड, महेंद्र मोरे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा गुरुवारी दाखल केला आहे.
हेही वाचा- शुक्रवारी उरण मध्ये शतकी पावसाची नोंद
या प्रकरणातील फिर्यादीकडून १५ लाख रुपये, सुद्लाई कोनार यांच्याकडून ९ लाख २० हजार रुपये चाँद मोहम्मद यांच्याकडून ७ लाख रुपये फातिमा शेख यांच्या कडून ४ लाख असे एकूण ४४ लाख ७१ हजार रुपये घेण्यात आले.
हेही वाचा- देवीच्या यात्रेला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी केली घरफोडी
हेवी डिपॉजिट म्हणजे नेमके काय ?
एखादे घर भाड्याने घ्यायचे असल्यास आगाऊ रक्कम आणि महिना भाड्याने घेतात तर दुसरी पद्धत हेवी डिपॉजिट. यात एक मोठी रक्कम घरमालकाला दिली जाते. जसे या प्रकरणात कोणी १५ लाख तर कोणी ९ लाखांची रक्कम दिली. हि रक्कम दोन किवा ठरलेल्या वर्षासाठी मालकाच्या कडे राहते व घर सोडते वेळी सर्व रक्कम पुन्हा भाडेकरूला देण्यात येते. दरम्यान विद्युत भार, केवळ भाडेकरू देतात.