गतवर्षीपेक्षा १४ कोटी अधिक असल्याचा प्रशासनाचा दावा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता थकीत कर वसुलीसाठी या वर्षी ५५० कोटी वसुलीचे लक्ष्य होते. वर्षांअखेरीस ४९३ कोटी जमा झाल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वसुली यंदाही अधिकच असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात महापालिकेने ढोल-ताशांचा गजर करीत अभिनव उपक्रम हाती घेतला होता. पालिका क्षेत्रात या सर्वाचा परिणाम म्हणून मार्च महिन्यात २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्थिक वर्षांच्या शेवटच्या मार्च महिन्यात पालिकेत १०० कोटींवर महसूल एकाच महिन्यात वसूल झाला होता.

२०१८-१९ या आर्थिक वर्षांत महापालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ५५० कोटी निश्चित करण्यात आले होते. पालिकेने

३१ मार्चअखेर वसुली ४९३ कोटी केलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या प्रत्यक्ष करवसुलीच्या १४ कोटी अधिकच वसुली केली असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे. अखेरच्या १० दिवसांत १८ कोटी वसुली केली आहे. विभाग अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर मार्च महिन्यात वसुलीचा वेग वाढला होता. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत ४७५ कोटी वसूल झाले आहेत.

२०१९-२० या पुढील आर्थिक वर्षांत अंदाजपत्रकात ८२५ कोटींचे मालमत्ता करवसुलीचे लक्ष देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी प्रत्यक्ष

करवसुली ४७९ कोटी झाली होती, तर यंदा गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजेच ४९३ कोटी वसुली झाली आहे. प्रत्यक्ष जीएसटीसापेक्ष अनुदानही गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे.

-अमोल यादव, उपायुक्त, स्थानिक संस्था कर

काही वर्षांतील वसुली

२०१४-१५ :     ४०७ कोटी

२०१५-१६ :     ५१५ कोटी

२०१६-१७ :     ६४४ कोटी

२०१७-१८:      ५३५ कोटी

२०१८-१९ :     ४९३ कोटी

२०१९-२०  वर्षांचे लक्ष्य : ८२४ कोटी.

जीएसटीसापेक्ष अनुदानही गतवर्षीपेक्षा अधिक

२०१७-१८ मध्ये जीएसटीसापेक्ष अनुदानातून १०८० कोटी मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; परंतु ते ११९५ कोटी प्राप्त झाले. परंतु गेल्या वर्षी अखेरच्या मार्च महिन्यात १२७ कोटी अनुदान प्राप्त झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षीची जमा १०७८ कोटी होती, तर २०१८-१९ या आर्थिक वर्षांत अनुदानाची रक्कम १११२ कोटी मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते मार्चअखेरीस ११७७ कोटी प्राप्त झाले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 493 crore property tax collected by navi mumbai municipal corporation