उरण : राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेल्याने उरणच्या वायू विद्युत केंद्रातील महाजनकोच्या वीज निर्मितीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उरणमधील वायू विद्युत केंद्रातील ५० मेगावॅटचा सयंत्र बंद झाला आहे. परिणामी वायू विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट वीज निर्मिती १६० वर आली आहे.

उरणच्या वायू विद्युत केंद्रात २६७ कामगार कार्यरत आहेत. या संपात ३० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र विद्युत कर्मचारी व अभियंता संघर्ष समिती आहे. वायु विद्युत केंद्रातील शंभर टक्के कामगार,अभियंते संपात सहभागी असून संपामुळे वायू विद्युत केंद्राच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, ५० मेगावॅट संच बंद झाला आहे. वीज निर्मिती सुरळीत ठेवण्यासाठी टाटा पॉवरचे तंत्रज्ञ बोलविण्यात आले असल्याची माहिती वायू विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.

हेही वाचा – रायगड : वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका उद्योग क्षेत्राला

उरण शहर व परिसरातील वीज गायब

बुधवारी सकाळी ५ वाजल्यापासून उरण शहर, केगाव आदी परिसरातील वीज गेल्याने येथील नागरिकांवर संपाचा परिणाम झाला आहे.

Story img Loader