पनवेल: मागील चार दिवसांत पेणधर ते बेलापूर या मार्गावर सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोची गारेगार सफर तब्बल ५२ हजार २३० प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महामेट्रोच्या तिजोरीत चार दिवसांत १६ लाख ८६ हजार ८८२ रुपये जमा झाल्याची माहिती सिडको महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने मंगळवारी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी सिडको महामंडळाने मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर चार दिवसांपूर्वी नवी मुंबई मेट्रो रेल्वेची सेवा तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर या प्रवासाने ५० हजारांची संख्या पार केली आहे. सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे मेट्रो रेल्वेतील गारेगार प्रवास करणारा वर्ग पर्यटनासाठी या रेल्वेचा अनुभव घेत आहे. बेलापूर, पेणधर या स्थानकांबरोबरच खारघर गाव आणि सेंट्रल पार्क या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच आरबीआय कॉलनी या स्थानकातून सर्वात कमी प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आरबीआय कॉलनी हे स्थानक वगळता इतर १० स्थानकांमध्ये पाचशेच्यावर प्रवासी संख्या नोंदविली गेली. सोमवारी दिवसभरात पेणधर आणि बेलापूर या स्थानकांतून सहा हजारांहून अधिक प्रवाशांनी टोकन तिकीट खरेदी केल्याची माहिती सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या सहअधिकारी गंधाली भोकरे यांनी दिली.

ST buses Amravati scrap , passengers Amravati ST bus,
अमरावतीत १४९ एसटी बसेस भंगारात; कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kolkata is India’s most congested city in 2024
India’s Most Congested City in 2024 : सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत पुणे तिसऱ्या स्थानावर; मुंबईचं स्थान कितवं? नवं सर्वेक्षण काय सांगतं?
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
Pune Mumbai Expressway New Link Road to Cut from Pune to Mumbai
पागोटे ते चौक मार्गामुळे मुंबई पुणे अतिजलद प्रवास; २० ते २५ किलोमीटरचे अंतर कमी होण्यास मदत
Loksatta shaharbaat Plight of railway passengers in suburban areas
शहरबात: रेल्वे प्रवासी उपेक्षित
Nitin Gadkari, cable car, Mumbai metropolitan area,
मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार – परिवहन मंत्री

हेही वाचा… उरणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा विकास नक्की कोण करणार

पेणधर ते बेलापूर या मार्गावर थेट तीन आसनी रिक्षातून आणि इकोव्हॅनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई मेट्रो सर्वात लाभदायी आहे. या पल्ल्यावर मेट्रोने गारेगार प्रवास केल्यास ४० रुपये मोजावे लागतात. सध्या याच पल्ल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची ५२ क्रमांकाची बस धावते. या बसच्या दिवसभरात ४६ फेऱ्या होतात. यामध्ये वातानुकूलित बसचे तिकीट भाडे ( तळोजा ते बेलापूर) २७ रुपये आहे. तसेच याच मार्गावर साध्या बसचे २१ रुपये भाडे एनएमएमटी आकारते. त्यामुळे मेट्रो सुरू झाली असली तरी अद्याप बसचे प्रवासी या सेवेकडे वळलेले नाहीत. अजूनही तळोजा वसाहतीमधून जेथून बसचा प्रवास सुरू होतो त्या आसावरी गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशव्दारावरील बसथांब्यावर सकाळच्या वेळेत बस प्रवाशांचा रांगा दिसून येत आहेत. काही प्रमाणात बसचे प्रवासी मेट्रोतून प्रवास करत असले तरी तीन आसनी रिक्षा आणि इकोव्हॅनने पूर्वी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जलद व सुलभ प्रवासामुळे मेट्रोला पसंती दिली आहे.

सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या सहअधिकारी गंधाली भोकरे यांनी सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम केले जाणार आहे, असे सांगितले.

चार दिवसांतील महसूलटोकन महसूलरुपये
१७ नोव्हेंबर९३१६२,७६,०६९
१८ नोव्हेंबर१५२४०५,७६,१३९
१९ नोव्हेंबर१७,६६१४,६३,५०२
२० नोव्हेंबर१५,०१३३,७१,१७२

मेट्रो मार्ग क्र. २, ३, ४

नवी मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग पेणधर ते बेलापूर सुरू होण्यासाठी तब्बल १४ वर्षे लागली. प्रस्तावित मेट्रो मार्ग २, ३ आणि ४ यांचे भवितव्य काय असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मेट्रो मार्ग क्रमांक २ तळोजा औद्यौगिक वसाहत ते खांदेश्वर (व्हाया कळंबोली) असा ७.१२ कि.मी.चा आहे. मेट्रो मार्ग क्रमांक ३ हा तळोजा औद्योगिक वसाहत ते पेणधर असून हे अंतर ३.८७ किलोमीटर आहे. तसेच मार्ग क्रमांक ४ हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पनवेल हा पल्ला ४.१७ किलोमीटर अंतराचा असून प्रस्तावित आहे.

Story img Loader