पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा क्षेत्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला होता. यामुळे मतदान केंद्रावरील विजेच्या खोळंब्यामुळे मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी उशिरा निवडणूक आयोगाकडे आली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या सुधारीत आकडेवारीनुसार मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून २५ लाख ८५ हजार १८ मतदार आहेत. यापैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी मतदान केल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली. पनवेल विधानसभा क्षेत्रात ५०.०५ टक्के मतदान झाल्याची नोंद मंगळवारी सकाळी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारीत प्रसिद्धी पत्रकात केली आहे. सोमवारी रात्री पनवेल विधानसभा क्षेत्रात ४९.२१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. २०१९ साली झालेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा क्षेत्रातील ५५.३३ टक्के म्हणजेच २,९८,३४९ मतदारांनी मतदान केले होते.
हेही वाचा – कल्याण मध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा…मार्गात बदल…समजून घ्या…
हेही वाचा – सुक्या मासळीच्या दरात वाढ, कोळंबीचे सोडे १३०० रुपये किलोवर
सोमवारी (रात्री) – मंगळवारी
पनवेल – ४९.२१ – ५०.०५
कर्जत – ६०.१२ – ६१.४०
उरण – ६४.७५ – ६७.०७
मावळ – ५३.०२ – ५५.४२
चिंचवड – ४९.४३ – ५२.२०
पिंपरी – ४८.२५ – ५०.५५