पनवेल : कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या दुर्लक्षित कारभारामुळे व्यापाऱ्यांकडून समितीने वर्षानुवर्षे जमविलेले तब्बल ५४ कोटी रुपये भामट्या महिलेने लंपास केले आहेत. या भामट्या महिलेने मागील दोन वर्षात स्वताला पनवेलच्या युको बँकेची शाखाधिकारी असल्याचे भासवून ही फसवणूक केली. याबाबत सोमवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमलेल्या संगीता डोंगरे यांच्या कार्यकाळात ही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या भामट्या महिलेची कोणतीही पडताळणी न करता तिने दिलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवल्यामुळे हा गुन्हा घडला असून बाजार समितीच्या व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांची या महिलेला साथ मिळाली का याविषयी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

राज्यातील सर्वात मोठा लोखंड व पोलाद बाजार कळंबोलीत आहे. ३०२ हेक्टर जमिनीवर १९१० गाळ्यांमध्ये येथे व्यापारी व्यवसाय करतात. बाजारातील गाळेधारकांकडून मिळणाऱ्या लाखो रुपयांचे विकास शुल्क, बाजार शुल्क, प्रवेश शुल्क या माध्यमातून समितीने कारभार करण्यासाठी गोळा केलेले कोटी रुपयांची लुट दुर्लक्षित कारभारामुळे झाली आहे. सुमन शर्मा व तीच्या साथीदारांनी बाजार समितीमधील सामान्य व्यापाऱ्यांच्या निधीवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. सुमन शर्मा हिने १ जून २०२२ मध्ये बाजार समितीच्या कार्यालयात येऊन स्वताची ओळख पनवेल येथील युको बँकेत प्रशासकीय अधिकारी असल्याची केली. युको बँकेच्या बनावट लेटरहेड बनवून सुमन हिने २०२२ मध्ये बाजार समितीला ठेवी बँकेत जमा केल्यास कमी वेळेत जादा व्याजदर देण्याचे दरपत्रक जमा केले. इतर बँकांच्या व्यवस्थापनाने बाजार समितीच्या निविदा प्रक्रीयेत सहभाग घेतला.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

आणखी वाचा-पनवेल महापालिका आयुक्तांचा विविध कामांचा आढावा, बैठकींचे सत्र सुरु

सुमन हिने दिलेले व्याजाचे दरपत्रक हे जादा असल्याने सुमनकडे बाजार समितीने ५४ कोटी २८ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा युको बँकच्या नावे धनादेश दिला. त्यानंतर सुमन हिने बाजार समितीला बनावट मुदत ठेवीच्या पावत्या सुद्धा दिल्या. मुदतठेवींची मुदत पुर्ण झाल्यावर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी तिला संपर्क साधल्यावर सुमन या अधिकाऱ्यांना ती टाळू लागली. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सुमनकडे ठेवींच्या परताव्यासाठी तगादा लावल्यावर तीने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना युको बँक ट्रेजरी अॅण्ड इन्व्हेस्टमेंट विभागाचे खोटे पत्र मेलवर पाठविले. वेळोवेळी मागणी करुन सुमन हीने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना ठेवीतील रक्कम परत न दिल्याने सुमन शर्मा हिच्यावर संशय आला. त्यानंतर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी पनवेल येथील युको बँकेत जाऊन खात्री केल्यावर त्यांना तेथे दुसऱ्याच महिला अधिकारी शाखाअधिकारी असल्याचे समजले. तसेच सुमन नावाची कोणतीही अधिकारी येथे पूर्वी आणि सध्या सुद्धा काम करत नसल्याचे उघड झाले. सुमन हिने दिलेल्या सर्व मुदतठेवीच्या पावत्या आणि इतर पुरावे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी युको बँकेत दाखविल्यावर फसवणूक झाल्याचे बाजार समितीच्या ध्यानात आले. अखेर बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांनी सुमन हिच्याविरोधात रितसर फसवणूकीचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविला.   

बाजार समितीच्या कारभार संशयास्पद 

१ एप्रिल रोजी संभाजी निकम यांनी बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे संगीता डोंगरे यांच्याकडून हाती घेतल्यावर त्यांच्यासमोर बाजार समितीचे कार्यकारी अधिकारी अमिष श्रीवास्तव यांनी १८ कोटी रुपयांच्या मुदतठेवींचा काळ पुर्ण झाल्याने पुनर्गुंतवणूक करावी किंवा कसे असा प्रस्वात समोर ठेवला. निकम यांनी १८ कोटी रुपये बाजार समितीच्या कॅनरा बँक खात्यात जमा करण्याविषयी भूमिका घेतली. वारंवार सुमन व तिला साथ देणाऱ्यांकडून पुनर्गुंतवणूक न केल्यास दंड व्याज लागेल, बँकेला एवढी रक्कम एकत्र काढल्यास मुल्यांकनावर परिणाम होईल व इतर कारणे सांगू लागले. सुमन ही स्वतः बाजार समितीच्या कार्यालयात येऊन मुदतठेवीचे धनादेश घेऊन जात होती. मागील दोन वर्षात सुमन हिने ५४ कोटी २८ लाख रुपयांचे ४७ हून अधिक धनादेश बाजार समितीच्या कार्यालयातून बँकेत जमा करण्यासाठी घेऊन गेली.

आणखी वाचा-पनवेल: पाण्याअभावी अंत्यविधी कसा करावा, कळंबोलीवासियांसमोरील अडचण

९ जून २०२२ ला बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाची सूत्रे केदारी जाधव यांच्याकडे असताना बाजार समितीच्या लेखाधिकारी पदाची जबाबदारी कार्यकारी अधिकारी अमिष श्रीवास्तव यांच्याकडेच होती. श्रीवास्वत, बाजार समितीचे मुख्य लिपीक संजय पाटील, कनिष्ठ लिपीक संगीता म्हात्रे यांनी पहिला ६ कोटी रुपयांचा धनादेश सुमनला दिल्यावर त्यावर युको बँक युवर सेल्फ असे लिहिल्याने तो धनादेश परत आला. त्यानंतर केदारी जाधव यांची बदली झाली. बाजार समितीच्या श्रीवास्तव, म्हात्रे व पाटील या मंडळींनी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता डोंगरे यांच्यासमोर मुदतठेवींसाठी हाच प्रस्वात ठेवल्यावर डोंगरे यांनी त्यास मंजूरी दिल्यावर बाजार समितीचे अध्यक्ष अशोककुमार गर्ग आणि डोंगरे यांच्या स्वाक्षरीने टप्याटप्याने कॅनरा बँकेतून रक्कम सूमन हिने दिलेल्या बँक खात्यात वर्ग झाली.

बाजार समितीच्या कोट्यावधी रुपयांच्या मुदतठेवी सुमनलाच मिळाव्यात यासाठी मागील दोन वर्षात व त्यापूर्वी सुमन बाजार समितीच्या कोण कोणत्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, याची चौकशी पोलीस करीत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांनी मुदतठेवींच्या प्रकरणात ५४ कोटींचा अपहार उजेडात आणला. मात्र बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांबद्दल कॅगने अहवालात ताशेरे ओढले आहेत. त्या अहवालाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निकम यांना घ्यावी लागणार आहे. वारंवार गैरव्यवहाराच्या तक्रारी होऊनसुद्धा अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यामुळे व्यापाऱ्यांची अनेक वर्षांची जमविलेल्या रकमेचा अपहार झाल्याचे बोलले जात आहे.