पनवेल : कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीच्या दुर्लक्षित कारभारामुळे व्यापाऱ्यांकडून समितीने वर्षानुवर्षे जमविलेले तब्बल ५४ कोटी रुपये भामट्या महिलेने लंपास केले आहेत. या भामट्या महिलेने मागील दोन वर्षात स्वताला पनवेलच्या युको बँकेची शाखाधिकारी असल्याचे भासवून ही फसवणूक केली. याबाबत सोमवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमलेल्या संगीता डोंगरे यांच्या कार्यकाळात ही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या भामट्या महिलेची कोणतीही पडताळणी न करता तिने दिलेल्या कागदपत्रांवर विश्वास ठेवल्यामुळे हा गुन्हा घडला असून बाजार समितीच्या व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांची या महिलेला साथ मिळाली का याविषयी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा