संतोष जाधव,लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई -राज्यभरात शासकीय वाहने पर्यावरणपुरक वाहने करण्याची मोहीम शासकीय पातळीवर सुरु असताना दुसरीकडे नवी मुंबई शहरात दळणवळणाच्या जास्तीत चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नागरीकांच्या शारीरीक तंदुरुस्तीच्या दृष्टीने व शहरात पर्यावरणपुरक वॉकॅबिलीटी वाढवण्यासाठी शहराचे आकर्षण असलेल्या पामबीच मार्गालगत ७.२ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार करण्यात येत असून ११.५८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प वादात सापडला असून पामबीचच्या देखण्या सौंदर्याच्या लगस सुरु असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामात ६० झाडे तोडल्याप्रकरणी पालिकेच्या बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.मिताली संचेती यांनी नेरुळ विभागाच्या उपअभियंत्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा प्रकल्प चांगलाच वादात अडकणार आहे.
शहरातील नागरीकंच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेने राबवलेल्या युलू सायकल प्रकल्पाला नवी मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला असून शहरात सायकलचा वापर हा निश्चितच होत असून शहरात लवकरच सायकलप्रेमींसाठी पामबीच मार्गालगतच्या समांतर रस्त्यालगत सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> दिरंगाईमुळे करंजा मच्छिमार बंदर कंत्राटदाराला साडेतीन कोटी रुपयांचा दंड; मार्च अखेर पर्यंत बंदराचे काम पूर्ण करण्याचे आदेश
पालिकेने आतापर्यंत एवढा मोठा ७.२किमी लांबीचा सायकल ट्रॅक बनवला नसून हा प्रकल्प अनेक तांत्रिक अडचणीत येणार आहे. पालिका मुख्यालयापासून सुरु होणारा हा सायकल ट्रॅक मोराज सर्कलपर्यंत जाणार आहे.या सायकल ट्रॅकचे काम मे. साकेत इन्फोप्रोजेक्ट यांच्या मार्फत सुरु असून वर्षभरापूर्वी या कामाचा कार्यादेश दिला असून काम पूर्ण करण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत आहे.परंतू याच पामबीच मार्गाला समांतर जाणाऱ्या या ट्रॅकमुळे अनेक झाडांचे नुकसान झाले असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरीकांकडूनही याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पालिका मुख्यालयापासून वजरानी चौकापर्यंतचा भाग हा बेलापूर विभाग कार्यालया्च्या हद्दीत येत असून नागरीकांच्या तक्रारीनुसार येथे बेलापूर विभागाचे उद्यान सहाय्यक प्रवीण जायगडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता जवळजवळ ६० झाडे या ठिकाणी दिसत नाहीत.त्यामुळे ठेकेदाराने ही झाडे तोडून कोठे नेली त्याला परवानगी कोणी दिली असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कडुनिंब ,आंबा, चाफा,फणस, गुलमोहर,कांचन अशी ६० झाडे तोडल्याप्रकरणी नेरुळ विभागाच्या उपअभियंता यांना बेकायदेशीर तोडीबाबत महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन व जतनअधिनियम १९७५ चे कलम २१(१) व २अंतर्गत कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली असून ७ दिवसाच्या आत खुलासा सादर करावा अन्यथा वृक्ष संवर्धन नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी कळवले आहे. त्यामुळे या प्रकरणात पामबीच सायकल ट्रॅकच्या साठी ६० झाडे कधी तोडली , ती गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ११.५८ कोटी खर्चाच्या या कामात वस्तुस्थितीजन्य नकाशे बनवणे,सायकल ट्रॅक बनवणे,ब्रीज व क्रॉसिंग बांधणे फ्लोरिंग करणे,रोलिंग बसवणे असे अनेक कामे आहेत.परंतू हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला असून यामुळे शहर अभियंता विभाग पालिका अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई एमआयडीसीतील महापे परिसरात ‘पाणीबाणी’ कायम; एक वर्षापासून अनियमित पाणीपुरवठा
नवी मुंबई शहराची निर्मिती सिडकोने नियोजनबद्धरित्या केल्यानंतर नवी मुंबई महापलिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे काम करण्यात आले आहे.शहरातल नागरीकांना चांगल्या भौतीक सुविधा देण्याबरोबरच शहरातील नागरीकांचे जीवनमान सुधारणे व त्यांना विविध योजना व प्रकल्पांद्वारे चांगल्या सुविधा देण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्याची आवश्यकता असताना शहरातील रस्ते,दळणवळणाच्या सोयी व इतर सोयीसुविधा देताना देखणी व चांगली उद्याने पालिकेने केली आहेत.तसेच शहरात सुरु करण्यात आलेल्या युलू सायकल मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहराचे सौंदर्य वाढवणारा पामबीच मार्ग असून त्याच्या लगतच तयार होणारा सायकल ट्रॅक विविध कारणांनी वादात सापडण्याची शक्यता आहे. झाडे तोडी प्रकरणी प्रत्यक्ष पाहणी व अहवाल करणाऱ्या बेलापूर विभागाच्या उद्यान सहाय्यकांनी पाहणी केली असता जी झाडे सुरवातीला होती ती झाडे दिसत नसून अनेक ठिकाणी तुटलेल्या मुळ्या दिसत आहेत. याच सायकल ट्रॅकच्या मार्गावर नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आहे. तर अनेक ठिकाणी ज्वेल ऑफ नवी मुंबई तसेच नेरुळ सर्कलपर्यंत अनेक अडचणी येणार असून या प्रकल्प आता चांगलाच अडचणीत येणार असे चित्र दिसत आहे. तर पालिकेच्या नेरुळ विभागाचे उपअभियंता सुधाकर मोरे यांना याबाबत विचारणा केली असता अद्याप आपल्याला कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगीतले तसेच याबाबत पत्र प्राप्त झाल्यास योग्य उत्तर देण्यात येईल असे सांगीतले.
स्थानिक नागरीकांच्या सायकल ट्रॅक तयार करत असताना झालेल्या झाडांच्या तोडीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उद्यान सहाय्यकांकडून अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार एकूण ६० झाडांच्या तोडीप्रकरणी नेरुळ विभागाच्या उपअभियंत्याला नोटीस बजावली असून ७ दिवसात म्हणने मांडण्याची मुदत दिली असून ती प्राप्त न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी कळवले आहे.
डॉ.मिताली संचेती, सहाय्यक आयुक्त ,बेलापूर विभाग.
मुळातच सायकल ट्रॅकचा प्रकल्प हा सुरवातीपासूनच वादातीत आहे. अद्याप महत्वाच्या काही परवानग्या पालिकेला मिळाल्या आहेत का हा मोठा प्रश्न असून पालिका मनमानी पध्दतीने काम करत असून हा प्रकल्प आणखी अडचणीत येणार आहे.पालिकेने आवश्यक असलेल्या महत्वाच्या परवानग्या मिळाल्याचे लेखी पुराव्यासह जाहीर करावे. त्यामुळे अभियंता विभागाच्या घिसाडघाईमुळे हा प्रकल्प अडचणीत येणार असून या प्रकल्पाच्या फायलीमागे लपलेल्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.
समीर बागवान, शिवसेना पदाधिकारी
ही ६० झाडे तोडली? कडुनिंब- १७, आंबा-१२, चाफा-४,फणस- ७, गुलमोहर- ८, कांचन- १२