लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : चाणक्य तलावाजवळ सातत्याने कांदळवनावर घाला घातल्याचे प्रकार समोर येत असताना कांदळवन व पाणथळी वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सातत्याने आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे एन्ह्वायर्न्मेंट लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई यांच्या व हजारो पर्यावरणप्रेमींच्या सहकार्यातून मागील ४ वर्षांत सलग दर रविवारी कांदळवन परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ६०० टन कचरा संकलनाचे अनोखे काम केले आहे. या मोहिमेत ‘मँग्रोज सोल्जर’ यांच्याकडून नुकतीच २०० वी स्वच्छता मोहीम नवी मुंबईत राबविण्यात आली.

नेरुळच्या एनआरआय संकुलाला लागून असलेला एक मोठा पट्टा शासनाने सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दिला आहे. पालिकेनेही या जमिनीवर टाकलेले पाणथळ आरक्षण हटवल्याने आधीच पर्यावरणप्रेमींमध्ये संताप आहे. खासगी विकासच्या माध्यमातूनच वारंवार छुप्या पद्दतीने खारफुटी तोडण्याचे प्रकार होत आहेत. परंतू २०० आठवडे एन्व्हायर्न्मेंट लाइफ फाऊंडेशनतर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात येते. या स्वच्छता मोहिमेला ६० हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींचा सहभाग लाभला आहे. २०२० पासून सुरू झालेल्या मोहिमेत वनशक्ती, वसुंधरा अभियान, महाविद्यालयीन विद्यार्थी, निर्धार फाऊंडेशन, विसपुते कॉलेज, रहेजा हॉटेल मॅनेजमेंट अशा संस्था सहभागी झाल्या आहेत.

आणखी वाचा-आयात-निर्यातीच्या बंद खोक्यांत तस्करीचा माल, सोमवारी पुन्हा दहा कोटींच्या सिगारेटचा साठा जप्त

कांदळवन व पाणथळ जागा वाचवण्यासाठी सलग ४ वर्षात पर्यावरण रक्षणासाठी ६० हजार नागरिकानी आपले योगदान दिले आहे. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींचा सहभाग महत्त्वाचा असतो.

विविध ठिकाणच्या शासकीय संस्था कांदळवनाच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करतात हे दु:खद आहे. २०२० पासून सुरु केलेली कांदळवन स्वच्छतेच्या मोहिमेतील सलग २०० वा आठवडा सारसोळे जेट्टी येथे झाला. यात युवक व विविध संस्थांचा सहभाग मोठा असून आतापर्यंत ६०० टन कचरा संकलित केला आहे. परंतु, कचरा संकलन करण्याची वेळच येऊ नये असे नागरिकांचे वर्तन हवे. ‘मँग्रोज सोल्जर’च्या मदतीने अखंडपणे ही मोहीम सुरू राहील असा प्रयत्न आहे. -धर्मेश बराई , एन्ह्वायर्न्मेंट लाईफ फाऊंडेशन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 600 tonnes of garbage collected from 200 kandalvan swachhta campaign mrj
Show comments