नवी मुंबई: फायनान्स मिनिस्ट्रीच्या बनावट पत्राचा आधार घेत नवी  मुंबईतील एका महिलेस फोन वर ईडी कारवाई करून अटक करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक

नवी मुंबईत राहणाऱ्या ६३ वर्षीय उच्च शिक्षित महिलेस शनिवारी एका मोबाईलवर एक फोन आला होता. फोनवर बोलणाऱ्याने स्वतःचे नाव राहुल देव असे सांगत फेडेक्स या पार्सल कंपनीतून बोलत असल्याचे त्यांना सांगितले.  एक पार्सल विदेशातून आले, मात्र त्यात काही स्मगलिंगचे साहित्य आढळून आले असून याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे स्काईप ( Skype ) या अँप   द्वारे फिर्यादी महिलेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सक्तवसुली संचानालय  (ईडी) , आणि फायनान्स मिनिस्ट्रीचे पत्र दाखवले व अटक करण्याची धमकी दिली. हि कारवाई टाळायची असेल तर पैसे पाठवा असे धमकावण्यात आले. यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याने विविध बँक खाते क्रमांक देत पैसे पाठवण्यास सांगितले.

हेही वाचा >>> बनावट शेअर ट्रेडिंग घोटाळा: इंडसइंड बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक; सायबर पोलीस ठाण्याची कारवाई

घाबरून फिर्यादी महिलेने वेगवेगळ्या तीन बँक खात्यात  एकूण ८० लाख दोन दिवसात पाठवले. मात्र पुन्हा पुन्हा मागणी होत असल्याने शेवटी त्यांनाही फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार प्राप्त होताच गुन्हा नोंद करत तात्काळ फिर्यादी यांनी ज्या ज्या बँकेत पैसे ऑनलाईन टाकले त्या बँकांना आरोपीचे खाते गोठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws