उरण : येथील बोकडविरा गावातील ललिता कृष्णकांत ठाकूर(६४) या विधवा महिलेची मंगळवारी हत्या झाली आहे. यातील आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलेच्या घरातील खोलीत राहणाऱ्या भाडेकरू वर पोलिसांचा संशय आहे. मंगळवारी सकाळी महिला आपल्या घराच्या शेजारीच काम करीत असलेल्या शाळेच्या किल्ल्या घेण्यासाठी चौकशी झाली. त्यावेळी तिच्या घराच्या दाराला कुलूप होते. मात्र त्यानंतर ही ती न सापडल्याने तिचा तपास सुरू होता. त्याचवेळी महिलेच्या भाडेकरूच्या खोलीच्या खिडकीतून महिला हात पाय व तोंड बांधलेले असलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर झालेल्या तपासात भाडेकरुच्या खोलीत ती मृतावस्थेत आढळून आली आहे. भाडेकरू फरार असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यासाठी विविध पथकांना बोलाविण्यात आले आहे. या घटनेमुळे भाडेकरू आणि त्यांचे वर्तन याकडे लक्ष देण्याची चर्चा सुरू आहे.