पनवेल :  एक तरुण रात्रीच्या साडेबारा वाजता दोन मुलींसोबत भांडत होता. तो तरुण मोठ्या आवाजात का भांडतोय, हे तिथे रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या एका ६९ वर्षीय डॉक्टरांनी पाहीले. एवढेच निमित्त झाल्याने या २० वर्षीय तरुणाने लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फॅक्चर झाले. हा सर्व प्रकार कामोठे वसाहतीमधील सेक्टर ७ येथे बुधवारी मध्यरात्री घडला.

हेही वाचा >>> अटलसेतूवरील महिला कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

injured young man share experience of dumper accident
पुणे : अचानक मोठ्या आवाजाने जाग आली आणि…, जखमी तरुणाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

सामान्य व्यक्ती सहसा रस्त्याकडेला उभे असले तरी कोणाच्या मदतीसाठी पुढे सरसावत नाहीत. दूसऱ्या व्यक्तीच्या अडचणी सोडविताना स्वताची अडचण वाढू नये असा त्यामागील भाव असतो. मात्र करंजाडे येथे राहणारे ६९  वर्षीय नंदलाल रायदास हे बुधवारी रात्री साडेबारा वाजता कामोठे वसाहतीमधील सेक्टर ७ येथील साईप्रसाद आर्केड या इमारतीजवळ रिक्षाची वाट पाहत उभे होते. या दरम्यान कामोठे वसाहतीमधील सेक्टर २२ येथील तुलसी हाईट्स या इमारतीमध्ये राहणारा २० वर्षांचा शंभुराज भोसले हा दोन मुलीसोंबत तिथे भांडण करत होता. डॉ. नंदलाल यांनी शुंभराज याच्याकडे मोठ्या आवाजाने का भांडण करीत आहेस एवढीच विचारणा केली याचा राग शंभुराज याला आल्याने त्याने डॉ. नंदलाल यांना लाथाबुक्याने मारहाण केली. जखमी अवस्थेत ६९ वर्षीय डॉ. नंदलाल हे रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतले. पहाटे पाच वाजता त्यांनी शंभुराज याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात मारहाणीबाबत गुन्हा नोंद केला असून हा गुन्हा सात वर्षांच्या पेक्षा कमी शिक्षेचा असल्याने संशयीत आरोपी शंभुराज भोसले याला कलम ४१ (अ)(१) फौजदारी प्रक्रीया संहिते अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

Story img Loader