प्रत्येकाच्या शिक्षण काळात १० वीची परीक्षा म्हटले की टेन्शन हमखास येतेच. ते केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांनीही वेगळी अवस्था नसते. या परिस्थितीत आजही बदल झालेला नाही. हीच बाब लक्षात घेत नवी मुंबईत गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा मागील २४ वर्षांपासून सराव परीक्षेचे आयोजन केले जाते. परीक्षा फॉर्म भरणे, हॉल तिकीट, दुसऱ्याच शाळेत नंबर, बोर्ड प्रमाणेच उत्तर पत्रिका असे वार्षिक परीक्षेप्रमाणेच या सराव परीक्षेचे स्वरूप असते, अशी माहिती माजी आमदार संदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा- बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना कायम नौकरीत समाविष्ट करा – आमदार मंदा म्हात्रे

३ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. आतापर्यंत या परीक्षेत दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या वर्षीही ७२ शाळेतील १० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. या परुक्षेत पहिला क्रमांक मिळवणार्याला टॅब व दुसरा व तिसरा येणाऱ्यालाही बक्षीस ठेवले गेले आहे. करोना काळ वगळता सलग २३ वर्षांपासून या परीक्षा घेतल्या जातात पहिल्या वर्षी म्हणजे १९९८ मध्ये केवळ ७०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

हेही वाचा- नवी मुंबई: ब्लॅक स्पॉट ठिकाणी सायकल ट्रॅक हवाच का?

नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्यासाठी ही सराव परीक्षा ठेवण्यात आली. मुख्य परिक्षेप्रमाणे वातावरण असते. जेणेकरून आपल्या चुका कळाव्या आपला अभ्यास किती झालाय नेमके कुठे कमी पडतोय अशी माहिती मिळते या चुका मुख्य वार्षिक परीक्षेत टाळता येतात लवकरच याचे अँप लॉन्च केले जाणार आहे, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केले.

Story img Loader