वीट वाहतूक होणा-या ट्रकमधून शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून अवैध मद्यसाठेची वाहतूक करताना एक कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित ट्रकचालकाकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून ७०० खोके मद्याच्या बाटल्या भरलेले सापडले. या सर्व मद्याची किंमत सूमारे पावणेदोन कोटी रुपये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले, सुदैवाने कोणीही जखमी नाही

गोव्यावरुन सिमेंट वीटाच्या आडून मद्यसाठ्याची वाहतूक सूरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या पथकाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरिक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निबंधक योगेश फटांगरे, शहाजी गायकवाड यांच्या पथकाने शनिवारी रात्री गोवा मुंबई महामार्गावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ सापळा रचला. रात्री उशीरा ट्रक क्रमांक एमएच ०४, ईव्हाय १९४९ या संशयीत ट्रकला रोखून त्याची तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली लपवलेले १३०० खोक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या. ही दारु मुंबईत आणून कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील एका गोदामात ठेवली जात होती. त्यानंतर या गोदामातून मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी आरोपी ट्रक चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी मध्यरात्री कळंबोली येथील गोदामात धाड टाकल्यावर तेथेही ७०० खोक्यांमध्ये मद्याने भरलेल्या विविध कंपन्यांच्या बाटल्या सापडल्या. आतापर्यंतची राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनवेलमधील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

हेही वाचा- खारकोपर ते नेरुळ – बेलापूर लोकल पूर्ववत होण्यासाठी पाच तास लागणार

कळंबोली लोखंड बाजार काळाबाजारासाठी सूरक्षित

सोमवारी मध्यरात्री कळंबोली लोखंड पोलाद बाजारातील ज्या गोदामात हा मद्यसाठा सापडला आहे. ते गोदाम खिडुकपाडा गावालगत आणि गोदामापासून ४०० मीटर अंतरावर जिल्हापरिषदेच्या शाळेची इमारत आहे. कोणत्याही सामान्य नागरिकांना संशय येणार नाही अशा पद्धतीने या गोदामामध्ये हा काळाबाजार सूरु होता. ७० लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा तेथे सापडला. कळंबोली लोखंड बाजारातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे हा बाजार चोरबाजार म्हणून ओळखला जातो. चोरट्यांचे साम्राज्य असलेल्या बाजारातील अवैध मद्यसाठेचे गोदाम हे मद्याचा काळा बाजार करणा-यांसाठी सूरक्षित ठिकाण आहे. पोलीस गाडीने बाजारातील गोदामापर्यंत गस्त घालायला बाजारात रस्त्यांची दयनिय स्थिती आहे. त्यामुळे पोलीसही घटना घडल्याशिवाय संबंधित गोदामापर्यंत पोहचू शकत नाहीत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 700 boxes of illegal liquor stock seized in kalamboli iron market godown panvel dpj