लोकसत्ता टीम

पनवेल : चॉकलेटचे आमिष दाखवून कळंबोलीमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता एका दुकानदाराने ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची रितसर तक्रार पालकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. 

आणखी वाचा-नवी मुंबई : राज्यशासनाकडून पथकर माफी, मनसेचा जल्लोष

पिडीत बालिका ही कळंबोलीत राहते. तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर या घटनेला वाचा फुटली. दुकानामध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून संशयीत आरोपीने बालिकेला दुकानात घेतले. त्यानंतर तीच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत बालिकेने घरी पालकांना सांगितल्यावर पोलीस ठाण्यात ४८ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण कायद्याअंतर्गत कारवाई केली.

Story img Loader