नवी मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच नवी मुंबईकरांचे डोळे पावसाकडे लागले असताना नवी मुंबई शहरात पहिल्याच दिवशी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर दुसरीकडे नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही पावसाचा श्रीगणेशा झाला असून पहिल्याच दिवशी मोरबे धरण परिसरातही एका दिवसात ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. कारण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे व धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेने २८ एप्रिलपासूनच शहरात पाणी कपात सुरू केली होती. त्यातच कडक उन्हाळा व नवी मुंबई शहर परिसरात व मोरबे धरण परिसरात जून महिन्यातील पहिले २३ दिवस कोरडेच गेल्यामुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली होती. त्यामुळे आठवड्यातून विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करण्यात येत असून पावसाने आणखी ओढ दिल्यास आठवड्यातून संध्याकाळी दोन दिवस पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला असून नवी मुंबईकर मोरबे धरण परिसराबरोबर शहरात जोरदार पावसाची अपेक्षा ठेवून आहेत.

Entry of wild elephants into Gadchiroli border Gadchiroli
रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
jayakwadi dam marathi news
Jayakwadi Dam: नाशिकमधून मराठवाड्याकडे ४८ टीएमसी पाणी, गंगापूरसह १२ धरणांमधून विसर्ग
Pune heavy rain, Pimpri Chinchwad rain,
पुणे, पिंपरी चिंचवडसह उपनगराला जोरदार पावसाने झोडपले
Entry ban for heavy vehicles in Mumbai including Thane and Navi Mumbai
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
Bhamragad rain, Gadchiroli,
गडचिरोली : पुरस्थिती! मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला, ५० कुटुंबे…
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा

हेही वाचा – वहाळचे उपसरपंच आणि सदस्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई पालिकेला जलसंपन्न महापालिका म्हणून संबोधले जात असताना यंदा मात्र पालिकेला पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली असली तरी धरणात फक्त ३४ दिवस पुरले एवढाच पाणीसाठी मोरबे धरणात शिल्लक आहे. पावसाला सुरुवात होण्यास जून महिन्याचे २३ दिवस कोरडे गेल्यामुळे नवी मुंबईकरांची चिंता अधिक वाढली होती. परंतु शनिवारपासून शहराबरोबरच मोरबे धरण परिसरातही पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु यावर्षी धरणात कमी पाणीसाठा असल्याने नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिका वारंवार करत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : पावसाचा दमदार श्रीगणेशा, १२ तासात बेलापूरमध्ये १०३ मिलिमीटर पावसाची नोंद

शहरात दररोज होणारा पाणीपुरवठा व त्याबाबतच्या नियोजनाबाबत बारीक लक्ष ठेवूनअसल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पावसाचा श्री गणेशा झाला असला तरी सध्या शहरात सुरू असलेली पाणी कपात मोरबे धरण परिसरात पडणाऱ्या पावसावर अवलंबून राहणार आहे. शहरातील पाणीपुरवठयाबाबत पालिका प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. पाणीपुरवठ्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गेल्यावर्षीही धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नव्हते. सद्यस्थितीला मोरबे धरणात फक्त २३.६७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील फक्त ३४ दिवस पुरेल एवढाच म्हणजेच २७ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी धरणात शिल्लक आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याची बचत करावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

मोरबे धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती

धरण पाणी पातळी – ६८.२७ मीटर
पाणीसाठा – २३.६७ टक्के
२७ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक