पनवेल: तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये सायंकाळी साडेसहा वाजता २१ वर्षीय तरुणाला नागाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला. अनिकेत कदम असे या तरुणाचे नाव आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
रात्री उशीरा अनिकेतची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मध्यरात्री त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी सकाळी अनिकेतच्या पार्थिवावर चिंध्रण गावातील स्मशानभूमीत अंतीमसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा… नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले… नेरूळ सेक्टर ४ येथे चालत्या गाडीवर झाड कोसळले
भाजपचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांनी अनिकेतच्या कुटूंबाला सरकारने नूकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
First published on: 31-07-2023 at 14:49 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 21 year old youth died due to snake bite in panvel dvr