पनवेल तालुक्यातील आदई गावाजवळील श्वान सांभाळ केंद्रात श्वानाचा मृत्यू झाल्याने सांभाळ केंद्र व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपुर्वी आदई येथील जे. डी. केनल डॉग केअर सेंटरमध्ये ही घटना घडली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा- नोकरीसाठी भूमिपुत्रांचा हल्लाबोल; शुक्रवारी कामगार व ग्रामस्थांचे गेट बंद आंदोलन
कामोठे येथे राहणा-या प्रिती पाटील यांनी घरात पाहुणे येणार असल्याने त्यांचा लेब्रोडॉर जातीचा सिंबा नावाचा श्वान जे.डी. केनल डॉग केअर केंद्रात सांभाळण्यासाठी सोडला होता. सिंबा श्वानाला दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास आंघोळ घातल्यानंतर तेथील कर्मचा-यांनी सूकविण्यासाठी टेबलवर ठेऊन हे कर्मचारी जेवणासाठी गेले होते. या दरम्यान सिंबाच्या गळ्यात चेन होती. चेन बांधली असल्याने सिंबाने टेबलावरुन शेजारच्या भिंतीकडे उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नादरम्यान सिंबाच्या गळ्याला फास बसला. आणि त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा- नवी मुंबई : बाजारात होळीची लगबग सुरू; नैसर्गिक रंगांनी बाजारपेठा फुलल्या
प्रिती पाटील व कुटूंबियांनी सिंबाचा अंत्यविधी पार पाडला. त्यानंतर हे कुटूंबिय नक्की काय झाले याची खात्री करण्यासाठी पुन्हा श्वान सांभाळ केंद्रातील सीसीटिव्ही कॅमेरातील कैद झालेले छायाचित्रन पाहीले. यामध्ये सिंबाने गळ्यात चेन असतानाही भिंतीवर उडी मारली त्यामुळे त्याच्या गळ्याला फास बसला, मात्र तो भिंतीला लटकत होता तेथील श्वान सांभाळ केंद्रचालकांपैकी कोणीच तातडीने त्याचा गळफास सोडविण्यासाठी पुढे आले नाही. यामुळे संतापलेल्या प्रिती यांनी क्रुरतेने सिंबाला वागणूक दिल्याची तक्रार केंद्रचालक किशन जाधव त्यांची पत्नी आणि कर्मचा-याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिली. याबाबत पोलीसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक १९६० कलमाव्दारे गुन्हा नोंदविला आहे.