वाशीतील मनपा रुग्णालयात उपचार करत असताना २३ मार्च २१९ विकी इंगळे याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विकीचे वडील राजेंद्र इंगळे यांनी मनपा डॉक्टरांच्या हलगर्जीने मृत्यू झाल्याचा आरोप करीत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्हा नोंद न झाल्याने अखेर इंगळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने ७ जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ए बी मिसाळ मनपा आयुक्त ,डॉ. प्रशांत जवादे , डॉ हेमंत इंगोले डॉ.किरण वळवी.डॉ.प्रभा सावंत डॉ.शरीफ तडवी , डॉ आरती गणवीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
हेही वाचा- उरण: खोपटे खाडीकिनारी मृत मासे, मृत्यूचे कारण अस्पष्ट
फिर्यादी राजेंद्र यांचा मुलगा विक्की राजेंद्र इंगळे वय २८ याच्या पोटात दुखण्याचे निमित्त झाले. त्याला वाशीतील मनपा प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी चौकशी समितीही नोंदवण्यात आली होती. मात्र त्यात डॉक्टरांची चूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे इंगळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ६ तारखेला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वरील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वाशी रमेश चव्हाण यांनी दिली.