बनावट कुपन द्वारे वाशीतील आरसी (ARCEE) इंटरनँशनल या इलेक्ट्रॉनिक शोरूममधून २ कोटी ४९ लाख ६१५ रुपयांच्या वस्तू परस्पर विकल्या प्रकरणी समीर निकम आणि अभिजित पाटील या दोन कर्मचार्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही २०१४ मध्ये नौकरीत रुजू झाले तर २०१९ पासून त्यांनी हा प्रकार सुरु केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : परदेशातही होतोय मराठीचा जागर ,मराठी मुलांकडूनच संस्कृती रुजतेय ; कवी श्री.अशोक नायगावकर

वाँरंटीमधील वस्तू जर वारंवार खराब होत असेल वा दुरुस्त होणे शक्य नसेल तर अशा ग्राहकांना त्या वस्तूंच्या किंमतीची कुपन्स दिली जात होती. ज्याचा वापर तो ग्राहक याच कंपनीच्या कुठल्याही शोरूममध्ये जाऊन त्या किंमतीची वस्तू खरेदी करू शकत होता. या दोघांनी असे बनावट कुपन बनवून  टिव्ही फ्रीज महागडे मोबाईल परस्पर अन्य चार छोट्या इलेक्ट्रॉनिक दुकानांना विकले. त्यातील तीन घाटकोपर तर एक डोंबिवलीत आहेत. माल पोहचवण्यासाठी गुप्ता नावाच्या एकाच रिक्षाचालकाचा वापर करण्यात आला होता. नोहेंबर मध्ये मालाची नियमित तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात तुट आढळून आली. मात्र, नसलेल्या मालाची विक्री झाल्याची कुठलीही नोंद नसल्याने शेवटी कुपन्सची तपासणी केली असता हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अफरातफर अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात माल विकत घेणारे व रिक्षा चालक यांना चोरीचा माल असल्याची माहिती नसल्याचे समोर आल्याने अद्याप तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद  तोरडमल यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against two employees who embezzled 2 5 crores in an electronic goods showroom using fake coupons in navi mumbai dpj